सध्या बॉक्स ऑफिसवर तीन मोठे चित्रपट आहेत. यात मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा ‘थॉर: लव्ह अँड थंडर’ (Thor: Love and Thunder), वरुण धवनचा ‘जुग जुग जियो’ (JugJugg Jeeyo) आणि विद्युत जामवालचा ‘खुदा हाफिज 2’ (Khuda Haafiz: Chapter 2) यांचा समावेश आहे. हॉलिवूड चित्रपट ‘थॉर’ला भारतात जबरदस्त ओपनिंग मिळाली असताना जुग जुग जियोने 16 दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. तर विद्युतचा खुदा हाफिज 2 हा बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशीही चांगल्या प्रतिसादासाठी संघर्ष करत आहे. ‘थॉर: लव्ह अँड थंडर’ने पहिल्या दिवशी 18.20 कोटी रुपयांची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 11.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यानंतर या चित्रपटाच्या कमाईत चांगलीच वाढ झाली. सध्या थॉरने भारतात तीन दिवसांत एकूण 37 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
पहिला दिवस- जगभरात 23.48 कोटी रुपये/ देशभरात 18.20 कोटी रुपये
दुसरा दिवस- जगभरात 14.71 कोटी रुपये/ देशभरात 11:40 कोटी रुपये
तिसरा दिवस- जगभरात 21.68 कोटी रुपये/ देशभरात 16.80 कोटी रुपये
चौथा दिवस- जगभरात 23.74 कोटी रुपये/ देशभरात 18.40 कोटी रुपये
#ThorLoveAndThunder has an excellent [extended] Weekend 1… Day 3 and 4 were back to Day 1 levels… Fifth biggest *opening weekend* [#Hollywood films]… Thu 18.20 cr, Fri 11.40 cr, Sat 16.80 cr, Sun 18.40 cr. Total: ₹ 64.80 cr. #India biz. NBOC. All versions. pic.twitter.com/jYXxLoZNyf
— taran adarsh (@taran_adarsh) July 11, 2022
विद्युत जामवाल आणि शिवालिका ओबेरॉय यांचा ‘खुदा हाफिज 2’ हा चित्रपट शुक्रवारी 8 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. फारुख कबीर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. ‘खुदा हाफिज 2’ने पहिल्या दिवशी 1.25 कोटी रुपयांची कमाई केली आणि शनिवारी त्यात थोडीशी वाढ झाली. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 1.75 कोटींचा गल्ला जमवत ‘खुदा हाफिज 2’ ने एकूण 3 कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘खुदा हाफिज 2’चं बजेट जवळपास 15 कोटी रुपयांचं आहे.
#JugJuggJeeyo witnesses an upward trend over the weekend… Premium multiplexes continue to attract footfalls, while mass pockets remain low… [Week 3] Fri 92 lacs, Sat 1.80 cr, Sun 2.05 cr. Total: ₹ 78.48 cr. #India biz. pic.twitter.com/fKCgfrLMh4
— taran adarsh (@taran_adarsh) July 11, 2022
राज मेहता दिग्दर्शित जुग जुग जियोमध्ये वरुण धवन, नीतू कपूर, अनिल कपूर, कियारा अडवाणी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 24 जून 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. पहिल्या आठवड्यात त्याने 50 कोटींचा व्यवसाय केला आणि दुसऱ्या आठवड्यात 19 कोटींची कमाई केली. आता तिसऱ्या शुक्रवारी 85 लाख आणि शनिवारी पुन्हा एकदा तेजी दाखवत 1.60 कोटी रुपये कमावले. जग जुग जियोने आतापर्यंत भारतात 71.67 कोटी रुपयांची कमाई केली आहे.