मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आज तिचा 37वा वाढदिवस साजरा करतेय. पवित्र रिश्ता (Pavitra Rishta) या मालिकेतून तिनं टीव्ही(TV)च्या दुनियेत प्रवेश केला होता. आपल्या या मालिकेतून अंकिता घराघरात पोहोचली. त्यानंतर अंकितानं बॉलिवूड(Bollywood)मध्येही पाऊल ठेवलं. तिचा मनिकर्णिका (Manikarnika) हा चित्रपट बॉक्स ऑफिस(Box Office)वर हिट ठरला. अंकितानं टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर ती आता कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण आहे.
3 मिलियन डॉलर्स
अंकिता चित्रपटासाठी कोटींमध्ये मानधन घेते. रिपोर्ट्सनुसार, अंकिता लोखंडेकडे 3 मिलियन डॉलर्स आहेत. ज्यांची भारतीय पैशांत किंमत करायची झाल्यास ती 22 कोटींच्या घरात जाते.
अंकिता लोखंडेचं मानधन
अंकिता लोखंडेनं अनेक शोंमध्ये काम केलं असून विविध सिनेमांतही आपल्या अभिनयाची छाप पाडलीये. पवित्र रिश्ता या मालिकेसाठी ती दीड लाख रुपये मानधन घेत होती. मनिकर्णिका या पहिल्या चित्रपटासाठी तिनं सुमारे 2-3 कोटी रुपये घेतले असल्याचं बोललं जातंय.
अंकिता लोखंडेचं घर
अंकिता लोखंडे आपल्या कुटुंबासह मुंबईत एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते. तिनं आता विकी जैनसोबत लग्न केलंय. आणि ती त्याच्यासोबत मुंबईतल्या 8 BHK अपार्टमेंटमध्ये राहणार आहे.
लक्झरी कारची आवड
अंकिता लोखंडे लक्झरी कारची शौकीन आहे. तिच्याकडे जॅग्वार एक्सजे आणि पोर्श 718देखील आहे. या गाड्यांची किंमत करोडोंच्या घरात आहे. अंकिता लोखंडेच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर तिनं पवित्र रिश्ता, झलक दिखला जा आणि पवित्र रिश्ता 2 या मालिकांमध्ये काम केलंय. तिच्या बॉलिवूड करिअरबद्दल सांगायचं, तर अंकिताने मनिकर्णिका आणि बागी 3मध्ये काम केलं आहे.
अंकितानं बांधली लगीन गाठ
अंकितानं नुकतंच तिचा प्रियकर विकी जैन याच्याशी लग्न केलं आहे. दोघांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अंकिता आणि विकीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोघेही प्रत्येक फंक्शनमध्ये एकत्र नाचताना दिसले. अंकिता आणि विकीच्या संगीतात कंगना रणौतही सामील झाली. कंगनाचे अंकितासोबतचे फोटो व्हायरल झाले होते. अंकिताचा नवरा विकीनं तिला मालदीवमध्ये एक व्हिला गिफ्ट केलाय. या व्हिलाची किंमत 50 कोटी सांगितली जातेय.