मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही कायमच चर्चेत असते. ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) अनेकदा आपल्या पर्सनल आयुष्याबद्दल बोलताना दिसते. ट्विंकल हिचा बरसात हा पहिला चित्रपट हीट ठरला. जान, दिल तेरा दीवाना, उफ ये मोहब्बत, जब प्यार किसीसे होता है या चित्रपटांमध्ये ट्विंकल खन्ना ही महत्वाच्या भूमिकेत होती. मात्र, या चित्रपटांना काही खास धमाल करता आली नाही. गेल्या काही दिवसांपासून ट्विंकल खन्ना ही बाॅलिवूड (Bollywood) चित्रपटांपासून लांब गेलीये. मात्र, सोशल मीडियावर ट्विंकल खन्ना ही कायमच सक्रिय असते. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना कायमच ट्विंकल खन्ना ही दिसते.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ट्विंकल खन्ना हिने बाॅलिवूड सोडण्याचे कारणही सांगू टाकले होते. ट्विंकल खन्ना म्हणाली होती की, सुरुवातीपासूनच मी अभ्यासात खूप हुशार होते, मला चार्टर्ड अकाउंटंट होण्याची इच्छा होती. मात्र, आई वडील दोघेही बाॅलिवूडमध्ये स्टार असल्याने मला चित्रपटांमध्ये काम करावे लागले.
सध्या ट्विंकल खन्ना तिच्या नव्या विधानामुळे प्रचंड चर्चेत आलीये. शेफ संजीव कपूर यांच्या चॅट शोमध्ये बोलताना ट्विंकल म्हणाली की, नितारा मोठी झाल्यावर तिला थेरपीची गरज भासू शकते, कारण लॉकडाऊनच्या वेळी मी तिला दररोज एकच गोष्ट खाण्यासाठी देत होते.
मला स्वयंपाक तयार करता येत नाही. मग पूर्ण लॉकडाऊनमध्ये मी मुलगी नितारा हिला फक्त पिनट बटर आणि टोस्ट खाऊ घातले. जेंव्हा ती मोठी होईल तेंव्हा तिच्या लक्षात येईल की, दुसरे लोक लॉकडाऊनमध्ये पिझा, पास्ता वगैरे खात होते. मस्त जेवण करत होते. मात्र, या काळात मी मुलीला फक्त आणि फक्त बटर आणि टोस्ट खाऊ घातले.
ट्विंकल खन्ना शेवटी लव के लिए कुछ भी करेगा या चित्रपटात दिसली होती. तिचा हा चित्रपट 2001मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर तिने कायमचा बाॅलिवूड चित्रपटांना निरोप दिला. 17 जानेवारी 2001 रोजी ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांचे लग्न झाले. अक्षय कुमार याच्यासोबत लग्न केल्यानंतर ट्विंकल खन्ना ही कोणत्याच चित्रपटामध्ये दिसली नाही.
गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहे. अक्षय कुमार याच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलीये. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, हा चित्रपट फ्लाॅप गेलाय.