मुंबई : बिग बॉस (Big Boss) OTT फेम उर्फी जावेद (Urfi Javed) कायमच चर्चेत असते. तिच्या कपड्यांमुळे अनेकदा तिला ट्रोल केले जाते. मात्र, अशा ट्रोलर्सला उर्फी कायमच सडेतोड उत्तर देते. सोशल मीडियावर उर्फीच्या फोटोंची जबरदस्त चर्चा असते. आपल्या हटके कपड्यांमुळे उर्फी वादातही अडकते. मात्र, यावेळी उर्फी एका वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आलीयं. फोटोग्राफर्सनी (पैपराजी) (Photographers) तिच्यावर कमेंट केल्यानंतर उर्फीचा पार चढला. कायमच उर्फी फोटोग्राफर्सला हसू- खेळून बोलते. मात्र, यावेळी असे नेमके काय झाले की, फोटोग्राफर्सच्या कमेंटनंतर उर्फी चांगलीच भडकली.
एका कार्यक्रमात पोहोचल्यावर उर्फी जावेदने फोटोग्राफर्सच्या चांगलाच समाचार घेतलायं. उर्फी जावेदने तिच्या कपड्यांवर कमेंट करणाऱ्या फोटोग्राफर्सचा क्लास घेतल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असून आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालायं. उर्फी जावेद व्हिडिओमध्ये म्हणताना दिसते आहे की, जेव्हा मी झलक दिखला जा 10 च्या ग्रॅंड लॉन्च इव्हेंटमध्ये गेले होते, तेव्हा काही फोटोग्राफर्सने माझ्या ड्रेसवर कमेंट केली होती.
पुढे बोलताना उर्फी जावेद म्हणाली की मी हे लास्ट सांगते आहे, यानंतर कृपया माझ्या कपड्यांवर कमेंट करू नका. यानंतर एकदाही तुमच्या बाजूने माझ्या कपड्यांवर कमेंट आली तर… मला हे अजिबात सहन होणार नाही. मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे आणि त्या बदल्यात मला हे मिळत आहे, यानंतर तरी असे करू नका. तुम्ही लोकांनी माझा मूड खूप खराब केलायं. मला कधीच वाटले नाही की, तुम्ही माझ्याशी असे वागाल. मी तुमचा कधीच अपमान केला नाही…असे उर्फी जावेदने म्हटले आहे.