Urfi Javed Wedding: कायम आपल्या तोकड्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात असणारी मॉडेल उर्फी जावेद सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर उर्फीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता उर्फीला तोकडे कपडे घालणं महागात पडलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवरमआक्षेप घेतल्यानंतर वाद टोकाला पोहोचला आहे. दरम्यान उर्फीने केलेलं वक्तव्य तुफान व्हायरल होत आहे. ‘मुस्लिम मुलासोबत कधीच लग्न करणार नाही…’ असं वक्तव्य उर्फीने केलं होतं.
उर्फी म्हणाली, ‘मी सुद्धा मुस्लिम आहे. पण मी मुस्लिम मुलासोबत लग्न करणार नाही. जेव्हा सोशल मीडियावर लोक कमेंट करतात. तेव्हा त्यामध्ये अनेक जण मुस्लिम असतात. मी इस्लामची प्रतिमा खराब करत आहे असं त्यंनी वाटतं. जे मुस्लिम आहेत, ते माझा विरोध करतात.’
उर्फी पुढे म्हणाली, ‘मुस्लिम समाजातील स्त्रीयांनी योग्य पद्धतीत वागावं असं पुरुषांना वाटतं. मी इस्लाम धर्माच्या नियमांचं पालन करत नाही. म्हणून अनेक जण माझा तिरस्कार करतात. मुस्लिम समाजातील पुरुषांनी महिलांवर हक्क गाजवायचा असतो. ते माझ्याकडून धर्मानुसार वागण्याची अपेक्षा करतात.’
‘मला इस्लामवर विश्वास नाही. म्हणून मी मुस्लिम मुलासोबत लग्न करणार नाही. मी कोणताही धर्म पाळत नाही, त्यामुळे मी कोणावर प्रेम करते याची मला पर्वा नाही. ‘ असं देखील उर्फी म्हणाली.
गेल्या काही दिवसांपासून उर्फी तिच्या कपड्यांमुळे तुफान चर्चेत आहे. शिवाय सध्या तिच्या तोकड्या कपड्यांमुळे वातावरण तापलं आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या अटकेची मागणी केल्यानंतर मॉडेलने देखील चित्रा वाघ यांना ट्विटरच्या माध्यमातून डिवचण्यास सुरुवात केली.
त्यानंतर शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी ‘उर्फी जावेदच्या कपड्यांना माझा विरोध कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार. त्यामुळे हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही.’ अशी ठाम भूमिका घेतली आहे.