मुंबई : ऊर्फी जावेद नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या अतरंगी आऊटफिटमुळे तर कधी तिच्या चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे. कधी तिच्या बेताल बोलण्यामुळे तर कधी तिच्या बिनधास्त वागण्यामुळे. सोशळ मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असलेली ऊर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. विशेष म्हणजे ऊर्फी हसतमुख असते. कोणतंही टेन्शन घेत नाही. पण या हसऱ्या चेहऱ्यामागे प्रचंड वेदना, दु:ख लपलं आहे. ऊर्फी अवघी 15 वर्षाची होती. तेव्हा तिच्या बाबतीत जे काही घडलं ते धक्कादायक होतं. तिच्या जागी कोणी असतं तर ती व्यक्ती सहनही करू शकली नसती. पण ऊर्फीने सर्व सहन केलं. तिने एक खळबळजनक मुलाखत दिली. त्यात धक्क्यावर धक्के देणारे दावे केले.
ऊर्फी जावेदने तिची आपबिती सांगितली. तिचं आयुष्य किती वेदनादायी आहे हे तिने सांगितलं. तिच्यासोबत असं काही घडलं होतं की तेव्हा म्हणजे वयाच्या 17व्या वर्षी तिने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. तिने असा निर्णय का घेतला याची माहितीही दिली. तिने सांगितलेलं कारण तुम्ही ऐकाल तर तुमच्याही पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही. Humans of Bombay ला तिने ही मुलाखत दिली. त्यात तिने ही माहिती दिली.
ऊर्फी जेव्हा 15 वर्षाची होती तेव्हा कुणी तरी तिचा फोटो पॉर्न साइटवर अपलोड केला होता. ती फोटो एकदम नॉर्मल होती. ट्यूब टॉप घालून तिने तिचा फोटो फेसबुकवर शेअर केला होता. कुणी तरी तिचा हा फोटो डाऊनलोड करून मॉर्फिंग न करता पॉर्न साईटवर अपलोड केला. हळूहळू सर्वांना त्या फोटोबाबत कळले. त्यावेळी तिच्यावर नको ते आरोप करण्यात आले. संशय घेण्यात आला. त्यामुळे ऊर्फी टेन्शनमध्ये आली होती.
इतकेच नाही तर तिला पॉर्न स्टार संबोधण्यात आले. तेव्हा मी जर पॉर्न स्टार आहे तर माझा तसला व्हिडीओ कुठे आहे? असा सवाल ती करायची. तरीही लोक तिला पॉर्न स्टार म्हणायचे. एवढेच नव्हे तर तिला तिच्या वडिलांनीही पॉर्न स्टार संबोधलं होतं. या सर्वातून वडिलांना कदाचित सहानुभूती हवी असेल. पॉर्न साईटवाले 50 लाख रुपये मागत असल्याचं वडिलांनी सर्व नातेवाईकांना सांगितलं होतं. ते लोक ऊर्फीला मारत आहेत, असंही वडिलांना नातेवाईकांना सांगितलं होतं. त्यामुळेच ऊर्फीने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर सहा बहिणींसोबत घर सोडून गेल्याचं ऊर्फीने सांगितलं. लखनऊमध्ये एक जागा मिळाली होती. तिथे त्या राहत होत्या. लहान मुलांची शिकवणी घेऊन घराचं भाडं देण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर ती दिल्लीत आली. तिथे इच्छा नसताना तिने कॉल सेंटरमध्ये नोकरी पत्करली. त्यानंतर ऊर्फी मुंबईत आली. पेइंग गेस्ट म्हणून राहू लागली. अनेक रोल्ससाठी ऑडिशन दिल्या. त्यानंतर तिला एका टीव्ही शोमध्ये एक छोटा रोल मिळाला. सध्या ऊर्फी यशाच्या शिखरावर आहे. तिचे डिझाइन्स विदेशातही फॉलो केले जात आहेत.