सिनेमा प्रदर्शनाच्या दिवशीच ज्येष्ठ अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप; ‘गुडबाय’ ठरला अखेरचा सिनेमा

| Updated on: Oct 07, 2022 | 11:52 AM

अरुण बाली हे बॉलिवूडमधील मोठं नाव होतं. त्यांनी अमिताभ बच्च यांच्यापासून शाहरुख खान, अक्षय कुमार आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यासोबतही काम केलं. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 40हून अधिक सिनेमे केले.

सिनेमा प्रदर्शनाच्या दिवशीच ज्येष्ठ अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप; गुडबाय ठरला अखेरचा सिनेमा
सिनेमा प्रदर्शनाच्या दिवशीच ज्येष्ठ अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: ‘हे राम’, ‘3 इडियट्स’, ‘लाल सिंह चड्ढा’ आणि ‘गुडबाय’ आदी सिनेमातून (cinema) आपल्या अभिनयाची छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली (Arun Bali) यांचं आज निधन झालं. ते 79 वर्षाचे होते. त्यांच्या मागे एक मुलगा आणि तीन मुली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते Myasthenia Gravis या दुर्धर आजाराने ग्रस्त होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या आजारावर ते उपचारही घेत होते. आज अखेर त्यांचा जीवनसंघर्ष संपला. Myasthenia Gravis हा एक दुर्धर आजार आहे. तो ऑटोइम्यून आजार आहे. नर्व्स आणि मसल्सच्या दरम्यानचं कम्युनिकेशन फेल्यूअर झाल्यावर हा आजार होतो. मेगा स्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा ‘गुडबाय’ (Goodbye) हा बाली यांचा अखेरचा सिनेमा ठरला.

अरुण बाली हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांना मुंबईतच हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना बोलण्यासही त्रास होत होता. त्यांना मायस्थेनिया ग्रॅव्हिस हा आजार झाल्याचं त्यांच्या मुलीनेही सांगितलं होतं. या आजाराची लागण होण्यापर्यंत ते सिनेमा आणि टीव्ही शोजमध्ये सक्रिय होते. आजच त्यांचा गुडबाय हा सिनेमाही रिलीज झाला आहे. या सिनेमात त्यांनी नीना गुप्ताच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. दु:खाची गोष्ट म्हणजे आजच त्यांचा मृत्यूही झाला.

हे सुद्धा वाचा

अरुण बाली हे बॉलिवूडमधील मोठं नाव होतं. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यापासून शाहरुख खान, अक्षय कुमार आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यासोबतही काम केलं. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 40हून अधिक सिनेमे केले. तसेच 25 हून अधिक टीव्ही शोज केले.

 

ते छोट्या पडद्यावरील नावाजलेले अभिनेते होते. त्यांनी अनेक सुपरहीट शोमध्ये काम केलं. बाली यांनी 90च्या दशकात सुरू केलं. 1991मध्ये आलेल्या ‘सौगंध’ या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर ‘एलगार’, ‘राजू बन गया जंटलमन’, ‘फूल और अंगारे’, ‘सत्या’, ‘राजकुमार’, ‘हे राम’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘केदारनाथ’, ‘थ्री इडियट्स’, ‘पीके’, ‘पानीपत’, ‘लालसिंह चड्ढा’, ‘बर्फी’ आदी सिनेमात काम केलं.

टीव्ही शोजमधील ‘दूसरा केवल’ ही त्यांचा पहिला शो होता. त्यानंतर ‘स्वाभिमान’, ‘कुमकुम’, ‘महाभारत कथा’, ‘देख भाई देख’, ‘मायका’ आदी शोमध्ये त्यांनी काम केलं. ‘कुमकुम’ या सीरियलमधील त्यांची आजोबांची भूमिका प्रचंड गाजली. ते केवळ अभिनेतेच नव्हते तर निर्माते आणि दिग्दर्शकही होते. त्यांना निर्माते म्हणून राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. त्यांना गाण्याचा छंद होता.