मुंबई : कतरिना कैफ आणि विकी काैशल यांच्या लग्नाला आज 1 वर्ष पूर्ण झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच कतरिना आणि विकी लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हिल स्टेशनला पोहचले होते. दोन दिवसांपूर्वी कतरिना हिने काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले होते. 9 डिसेंबरला कतरिना आणि विकी हे लग्न बंधणात अडकले होते. त्यांनी राजस्थान येथील सवाई माधोपूर येथे लग्न केले. आज सकाळपासूनच कतरिना आणि विकी यांना चाहते लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
नुकताच कतरिना आणि विकी यांनी सोशल मीडियावर लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केलीये. कतरिना हिने लग्नामधील फोटो आणि हिल स्टेशनवरील विकीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विकी हा एका म्युझीकवर डान्स करताना दिसत आहे.
विकीने देखील लग्नामधील एक फोटो शेअर केला असून कतरिनाचे आणि त्याचे काही फोटोही शेअर केले आहेत. या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत. लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आता कतरिना आणि विकी यांच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. या पोस्टवर कमेंट करत यांना चाहते शुभेच्छा देत आहेत. आता कतरिना आणि विकी यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्नाच्या वर्ष अगोदर एकमेकांना डेट करत होते. शेवटी यांनी 9 डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे लग्न केले. यांनी लग्नाचे काही खास फोटो हे आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले होते.