मुंबई : गोविंदा नाम मेरा हा विकी काैशलचा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झालाय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील मिळतोय. गेल्या काही काळापासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर काही खास धमाल करू शकत नाहीये. इतकेच नाहीतर नुकताच रिलीज झालेला रोहित शेट्टी याचा सर्कस हा चित्रपट देखील काही खास धमाल करू शकला नाहीये. रोहित शेट्टीचा हा चित्रपट बिग बजेटचा आहे. यापूर्वी अक्षय कुमारपासून ते आमिर खानपर्यंत अनेकांचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप गेले आहेत.
कोरोनानंतर बाॅलिवूडच्या चित्रपटांना बाॅक्स ऑफिसवर धमाका करण्यास यश मिळत नाहीये. सतत बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात आहेत. याला फक्त अजय देवगणचा चित्रपट दृश्यम 2 हा अपवाद ठरला. या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर धमाका केला.
बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात असल्याचे आता मोठे कारण अभिनेता विकी काैशल याने सांगितले आहे. विकी म्हणाला मला वाटते की, चांगले चित्रपट सध्या चालत आहेत. लोकांनी या गोष्टीला आता खूप सिंपल केले आहे.
जर त्यांना एखादा चित्रपट चांगला वाटत असेल मग तो कोणत्याही भाषेतील किंवा कोणत्याही स्केलचा असो त्याला प्रेक्षकांचे प्रेम मिळते. पुढे विकी म्हणाला, लोकांनी हे स्पष्ट केले आहे की, फक्त आम्हाला चित्रपट चांगला वाटायला हवा.
दृश्यम 2, भूल भुलैया 2, केजीएफ 2, आरआरआर या चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे. परंतू हे सर्व चित्रपट कोणत्याच एका भाषेतील नव्हते. यांची स्केल आणि मार्केटिंग देखील वेगळी होती.
आजकाल लोकांना जे चित्रपट आवडतात तेच ते पाहतात. आता प्रेक्षकांचे असे दिसत आहे की, चांगले चित्रपट तयार करा…आम्ही त्याला प्रेम देऊ…आता विकीच्या याच विधानावर चर्चा होताना दिसत आहे.