Shahid Kapoor House | एखाद्या ‘राजमहाल’सारखे आहे शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचे घर, आलिशान घरामध्ये आहे तब्बल

| Updated on: Apr 14, 2023 | 7:59 PM

बाॅलिवूड अभिनेता शाहिद कपूर हा कायमच चर्चेत असतो. शाहिद कपूर याची पत्नी बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम करत नाही. मात्र, तरीही मीरा राजपूत हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सोशल मीडियावर मीरा राजपूत सक्रिय असते.

Shahid Kapoor House | एखाद्या राजमहालसारखे आहे शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचे घर, आलिशान घरामध्ये आहे तब्बल
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) याची पत्नी मीरा राजपूत ही कायमच चर्चेत असते. मीरा राजपूत जरी बाॅलिवूड चित्रपटांपासून चार हात दूर असली तरीही तिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते. फॅन फाॅलोइंगमध्ये एखाद्या बाॅलिवूड अभिनेत्रीला देखील मीरा राजपूत (Mira Rajput) मागे टाकते. विशेष म्हणजे अनेकदा सोशल मीडियावर (Social media) मीरा राजपूत ही बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मीरा यूट्यूबवर एक चॅनल देखील चालवते. यामध्ये ती आपल्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांना माहिती शेअर करताना दिसते.

नुकताच मीरा राजपूत हिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये मीरा राजपूत हिच्या घराची झलक चाहत्यांना बघायला मिळत आहे. मीरा राजपूत आणि शाहिद कपूर यांचे मुंबईतील वरळी भागामध्ये आलिशान घर आहे. विशेष म्हणजे या घरामध्ये एक वर्षापूर्वीच मीरा राजपूत आणि शाहिद कपूर त्यांच्या मुलांसोबत राहण्यासाठी गेले आहेत.

मीरा राजपूत आणि शाहिद कपूर यांचे हे आलिशान घर पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. मीरा राजपूत हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पियानो रूम, वॅनिटी रूम दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मीरा राजपूत ही मेकअप करताना दिसत आहे. मेकअपनंतर वेगळ्या रूममध्ये जाऊन परत फोटोशूट करण्यात आले. शाहिद कपूर याच्या घराची एक झलक पाहण्यास मिळाल्याने चाहते आनंदी झाले आहेत.

मीरा राजपूत हिने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. गेटवे ऑफ इंडिया मध्ये झालेल्या Diar शोमध्ये मीरा राजपूत पोहचली होती. काही दिवसांपूर्वीच मीरा राजपूत हिने मोठा खुलासा करत आपल्याला स्टार किड्स या शब्दाची चिड येते असे म्हटले होते. तसेच स्टार किड्सऐवजी नेमका कोणता शब्द वापरावा यावरही विचार करण्याची गरज असल्याने मीरा राजपूत हिने म्हटले.

काही दिवसांपूर्वी शाहिद कपूर हा त्याच्या फर्जीमुळे चर्चेत होता. फर्जीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. फर्जी ओटोटीवर रिलीज झाला होता. काही दिवसांपूर्वी शाहिद कपूर याने मोठे भाष्य केले होते. आपण एक अभिनेता असल्यामुळे आपल्या कुटुंबियांना आणि मुलांना नेमके काय सहन करावे लागते हे शाहिद कपूर याने सांगितले होते. या मुलाखतीनंतर शाहिद कपूर हा प्रचंड चर्चेत आला होता.