मुंबई : क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे त्यांच्या चिमुकलीला घेऊन वृंदावनला गेले होते. न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी विराट आणि अनुष्का हे विदेशात होते. परंतू विदेशातून थेट वृंदावन गाठत त्यांनी प्रेमानंद गोविंद शरण महाराज यांच्या आश्रमाला भेट दिली. याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल देखील झाले. मात्र, नेहमीप्रमाणे फोटोमध्ये आणि व्हिडीओत विराट आणि अनुष्का यांनी त्यांची लेक वामिका हिचा चेहरा दिसू दिला नव्हता. व्हिडीओमध्ये फक्त वामिकाच्या चेहऱ्यावर इमोजी लावण्यात आले होते.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे त्यांच्या मुलीचा चेहरा कधीच दिसू देत नाहीत. अनेकदा विराट आणि अनुष्का वामिकाचे फोटो घेण्यास फोटोग्राफरला सरळ मनाई करतात, हे आपण नेहमीच बघितले असेल.
विराट आणि अनुष्काच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायमच आतुर असतात. प्रेमानंद गोविंद शरण महाराज यांच्या आश्रमाला विराट आणि अनुष्काने भेट दिलेला व्हिडीओ व्हायरल होतोय.
विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये वामिका ही अनुष्का शर्माच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. आता जो व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये वामिका हिचा पूर्ण चेहरा दिसत आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय.
हा व्हिडीओ पाहून चाहते वामिका नेमकी कोणासारखी दिसते, याचा अंदाजा लावताना दिसत आहेत. यापूर्वी एका मॅचवेळी वामिकाची झलक चाहत्यांना बघायला मिळाली होती. आता ही दुसरी वेळ आहे, वामिका व्हिडीओमध्ये दिसत आहे.
वामिका अनुष्का शर्मासारखीच दिसत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. प्रेमानंद गोविंद शरण महाराज यांच्या आश्रमामध्ये अनुष्का शर्मा हिला ओढणी आणि वामिकाच्या गळ्यात माळ टाकलेली दिसत आहे.