मुंबई : ‘डर्टी पिक्चर’ फेम अभिनेत्री विद्या बालनने (Vidya Balan) तिच्या पुढील चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. ती ‘स्कॅम 1992’ (Scam 1992) स्टार प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ आणि सेंधील राममूर्ती या कलाकारांसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. विद्याच्या या नव्या चित्रपटाची कथा आधुनिक नातेसंबंधांवर आधारित एक ग्लॅमरस ड्रामा-कॉमेडी असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शीर्षा गुहा ठाकुर्ता करणार आहेत. स्वतः अभिनेत्री विद्या बालन हिने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
विद्या बालनची ‘शेरनी’ चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी खूप प्रशंसा झाली. आता ही अभिनेत्री पुढे शीर्षा गुहा ठाकुर्ता दिग्दर्शित कॉमेडी ड्रामामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ आणि सेंधील राममूर्ती यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अभिनेता सेंधील राममूर्ती नेटफ्लिक्स शो ‘नेव्हर हॅव आय एव्हर’साठी ओळखला जातो.
विद्या बालनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली केली. तिने या चित्रपटातील चारही कलाकारांचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, आम्ही या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे, जे सध्या मुंबई आणि उटी येथे शूट केले जात आहे. या चित्रपटात विद्या काव्या नावचे एक पात्र साकारत आहे. तिने लिहिले की, ‘आधुनिक नातेसंबंधांवर आधारित माझा पुढील शीर्षक नसलेला चार्मिंग ड्रामा-कॉमेडी, जो कदाचित तुमची कथा किंवा तुमच्या मित्राची कथा असू शकतो. जो तुम्हाला हसवेल आणि रडवेल देखील. मला काव्या साकारताना खूप मजा आली आहे. शीर्षा गुहा ठाकुर्ता यांच्याद्वारे दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात काम केल्याबद्दल आणि सहकलाकारांसोबत अशी अप्रतिम पोझ मिळाल्याबद्दल खूप आनंद झाला आहे.’
विद्या बालनचा हा चित्रपट आधुनिक नातेसंबंधांवर पुरोगामी विचार मांडणार आहे. मोठ्या पडद्यावर सादर केल्या गेलेल्या या विषयांमध्ये हा काहीसा नव्या धाटणीचा चित्रपट ठरणार आहे. इलिपसिस सोबत विद्याचा हा दुसरा प्रोजेक्ट असणार आहे. तिने यापूर्वी ताहिरा कश्यपच्या ‘शर्माजी की बेटी’मध्ये एकत्र काम केले होते. विद्या बालनचा हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज होणार आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक शीर्षा गुहा ठाकुर्ता म्हणाल्या की, ‘जेव्हा मी ही कथा पहिल्यांदा ऐकली, तेव्हा मी लगेचच तिच्या आशयाकडे आकर्षित झाले. कथेच्या आशयामध्ये अतिशय प्रामाणिकपणा आणि विनोदही आहे. या दिग्गज कलाकारांसोबत काम करणे हे एक स्वप्न होते. त्यांची काम करण्याची शैली मला नेहमीच आवडते.’ या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मुंबई आणि उटी येथे सुरू आहे.
बोल्ड अवतारात जान्हवी कपूरने वाढवला वाळवंटाचाही पारा! फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘हाय गर्मी….’