मुंबई : अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Devarakonda) अभिनीत बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक ‘Liger’ येत्या 25 ऑगस्ट 2022 रोजी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची पहिली झलक 31 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे, ज्यात अनन्या पांडे देखील दिसणार आहे. त्याचा एक भाग म्हणून जाहिराती, निर्मात्यांनी चित्रपटाच्या पहिल्या झलकची तारीख आणि वेळ जाहीर करणारा एक टीझर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओची सुरुवात व्हॉइसओव्हरने होते आणि निर्माते घोषणा करतात, ‘विटनेस द मॅडनेस. 31 डिसेंबर रोजी सकाळी 10:03 वाजता झलक…’
करण जोहरने ट्विटरवर टीझर शेअर केला आहे. लोकप्रिय दिग्दर्शक पुरी जगन्नाध यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अनेक रोमांचक पैलू दिसणार आहेत, ज्यात दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे. बॉक्सिंग लिजेंड माईक टायसन हा बहुप्रतिक्षित स्पोर्ट्स अॅक्शन चित्रपट ‘लायगर’ द्वारे भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
It’s almost time to unleash the beast to the nation! Starting your new year with a bang and a few punches!!#LigerFirstGlimpse on DEC 31st @ 10:03AM #LIGER @TheDeverakonda @MikeTyson #PuriJagannadh @ananyapandayy @Charmmeofficial @apoorvamehta18 pic.twitter.com/EWbYou45rJ
— Karan Johar (@karanjohar) December 29, 2021
हा चित्रपट सुरुवातीपासूनच प्रसिद्धी झोतात आला आहे. परंतु, कोरोना महामारीमुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याचे शूट थांबवले होते. या स्पोर्ट्स ड्रामामध्ये विजय देवराकोंडा पूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार येणार आहे. निर्मात्यांनी मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. सिनेमॅटोग्राफी विष्णू सरमा यांनी केली आहे. पुरी जगन्नाथ, चर्मे कौर, करण जोहर आणि अपूर्व मेहता एकत्र चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
जानेवारीच्या सुरुवातीला, करण जोहरने चित्रपटाचे अधिकृत पोस्टर शेअर केले होते. यात विजयचा बॉक्सर म्हणून फर्स्ट लुक अनावरण केला होता. या चित्रपटाचे शीर्षक आणि पहिला लुक शेअर करताना करण जोहरनं लिहिलं की, ‘विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे – तुमच्यासमोर LIGER ची घोषणा करताना मला खूप अभिमान वाटतोय. या चित्रपटाचं दिग्दर्शन उत्तम दिग्दर्शक पुरी जगन्नाथ करत आहेत. ही कथा हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या 5 भाषांमध्ये येणार आहे. #liger #SaalaCrossBreed’
SIKKAD me RAKKA @karanjohar ..when a LION does something to a TIGER @TheDevaraKonda is born ..Thank u @purijagan and @Charmmeofficial the poster looks doubleisssmart than issmart??? pic.twitter.com/5fivu2xpPA
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) January 18, 2021
या चित्रपटात विजय देवरकोंडा पूर्णपणे वेगळ्या स्टाईलमध्ये दिसणार आहे. अलीकडेच विजय थायलंडला गेला होता तिथं त्यानं मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेतलंय. या चित्रपटात विजय आणि अनन्याशिवाय राम्या कृष्णन, रोनित रॉय, विष्णू रेड्डी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ हे करत असून करण जोहर आणि अपूर्व मेहता या चित्रपटाची एकत्र निर्मिती करत आहेत.