Liger: ‘लायगर’ची IMDb रेटिंग पाहून विजय देवरकोंडाला बसेल धक्का!

| Updated on: Aug 28, 2022 | 10:49 AM

अक्षय कुमारच्या 'रक्षाबंधन'ला 4.6 रेटिंग मिळाली असून तापसी पन्नूच्या 'दोबारा' या चित्रपटाला 2.9 रेटिंग मिळाली आहे. आमिरच्या लाल सिंग चड्ढाची रेटिंग 5 असून या सगळ्यांत कमी 'लायगर'ची रेटिंग आहे.

Liger: लायगरची IMDb रेटिंग पाहून विजय देवरकोंडाला बसेल धक्का!
Liger
Image Credit source: Twitter
Follow us on

विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) हे नाव आता फक्त दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपुरतंच मर्यादित राहिलेलं नाही. ‘लायगर’ (Liger) या चित्रपटातून नुकतंच विजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. विजय आणि अनन्या पांडेनं (Ananya Panday) संपूर्ण देशातील 17 विविध शहरांमध्ये या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं. यावेळी विजयला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं. मात्र 25 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होताच चाहत्यांची निराशा झाली. सोशल मीडियावर ‘लायगर’ला संमिश्र प्रतिसाद मिळत असून अनेकांना हा चित्रपट आवडला नाही. एकीकडे बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कमाई फारशी होत नसताना दुसरीकडे ‘लायगर’ची IMDb रेटिंगसुद्धा इतर चित्रपटांच्या तुलनेत फारच कमी असल्याचं पहायला मिळतंय. ‘इंडिया टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार लाल सिंग चड्ढा, रक्षाबंधन या चित्रपटांपेक्षाही कमी IMDb रेटिंग विजयच्या चित्रपटाला मिळाली आहे.

अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ला 4.6 रेटिंग मिळाली असून तापसी पन्नूच्या ‘दोबारा’ या चित्रपटाला 2.9 रेटिंग मिळाली आहे. आमिरच्या लाल सिंग चड्ढाची रेटिंग 5 असून या सगळ्यांत कमी ‘लायगर’ची रेटिंग आहे. लायगरला 10 पैकी 1.7 आयएमडीबी रेटिंग मिळाली आहे. ‘लायगर’ हा विजयचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत ‘लायगर’ने 5.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ही फक्त हिंदी व्हर्जनची कमाई आहे.

IMDb रेटिंग म्हणजे काय? ती का महत्त्वाची?

आयएमडीबी म्हणजेच इंटरनेट मुव्ही डेटाबेस. आयएमडीबी हा ऑनलाइन डेटाबेस प्लॅटफॉर्म असून त्यावर चित्रपट पाहणारे रसिकप्रेक्षक आपल्या रेटिंगद्वारे एखाद्या कलाकृतीचा दर्जा ठरवतात. या प्लॅटफॉर्मवर स्टार्स पद्धतीने रेटिंग दिलं जातं. 10 हे सर्वाधिक रेटिंग असून चित्रपट, मालिका, वेब सीरिज, व्हिडीओ गेम्स अशा विविध गोष्टींना इथं रेटिंग देता येतं. आयएमडीबीचं रेटिंग जितकं अधिक तितका तो चित्रपट, मालिका किंवा वेब सीरिज लोकांना भावल्याची पोचपावती असते.

हे सुद्धा वाचा