बालगंधर्व रंगमंदिरात विक्रम गोखले यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवले जाणार

| Updated on: Nov 26, 2022 | 4:22 PM

गेल्या काही दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू होते.

बालगंधर्व रंगमंदिरात विक्रम गोखले यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवले जाणार
Follow us on

मुंबई : दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाल्याने सर्वत्र दुखाचे वातावरण बघायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू होते. सुरूवातीपासूनच सांगितले जात होते की, विक्रम गोखले यांची तब्येत नाजूक असून डाॅक्टर प्रयत्न करत आहेत. काल हेल्थ अपडेटमध्ये सांगण्यात आले होते की, उपचाराला विक्रम गोखले चांगला प्रतिसाद देत असून पहिल्यापेक्षा आता त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा आहे.

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात विक्रम गोखले यांनी शेवटचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांच्या अशाप्रकारे जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मराठी आणि बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केलाय.

विक्रम गोखले यांचे पार्थिव बालगंधर्व रंगमंदिरामध्ये पोहचले असून तिथे बालगंधर्व रंगमंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातून हे पार्थिव हलवण्यात आले आहे.

विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी कळताच चाहत्यांनी दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाकडे धाव घेतली. आता बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात देखील गर्दी वाढताना दिसत आहे.

विक्रम गोखले यांचे पार्थिव येथे दर्शनासाठी काही वेळ ठेवले जाणार आहे. विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी पुण्याकडे धाव घेतलीये.

काही दिवसांपूर्वी विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी आली होती. त्यानंतर अनेक बॉलिवूड स्टार्सनी यावर शोक व्यक्त करण्यास सुरुवात केली होती, अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केल्या होत्या.