मुंबई : ‘द काश्मीर फाईल्स‘ (The Kashmir Files)हा सिनेमा अनेक रेकॉर्ड रचतोय. एकीकडे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर छप्परतोड कमाई करतोय. तर दुसरीकडे वादांची भली मोठी मालिका या सिनेमाच्या भोवती फेर धरतेय. अश्यात हा सिनेमा आता 150 कोटीकडे वाटचाल करतोय. एकाअर्थी हा सिनेमा बॉक्सऑफिसवर ‘बाहुबली’ (Bahubali) ठरतोय. मागच्या आठवड्यातील शुक्रवारी म्हणजेच 11 मार्चला हा सिनेमा रिलीज झाला. तेव्हापासूनच हा सिनेमा बॉक्सऑफिस गाजवतोय. दिवसेंदिवस या सिनेमाच्या कमाईत वाढ होतेय. पहिल्या दिवशी या सिनेमाने 3.55 कोटी रुपयांची कमाई केली. तर काल शनिवारी 24.80 कोटी रुपये या सिनेमाने कमावले आहेत. थोडक्यात काय तर आजूबाजूला महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा झुंड (Jhund) , संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) आणि आलिया भटचा (Alia Bhatt) ‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) यासारखे दिग्गज सिनेमे असताना कमाईच्या बाबतीत हा सिनेमा ‘दंगल’ करतोय. आज रविवार असल्याने या सिनेमाच्या कमाईत वाढ होईल असा अंदाज आहे.
सिनेमाच्या ट्रेंडचे अभ्यासक तरण आदर्श यांनी ट्विट करत ‘द काश्मीर फाईल्स’ च्या कमाईबाबत माहिती दिली आहे. हा सिनेमा बाहुबली सारखा ट्रेंड करत असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. तसंच हा सिनेमा या विकेंडला म्हणजेच आज 28-30 कोटींची कमाई करेन, असं तरण आदर्श म्हणालेत.
#TheKashmirFiles is a ONE-HORSE RACE… Day 9 [Sat] is HIGHER than *all 8 days*… Trending like #Baahubali2 in *Weekend 2*… There’s a *strong possibility* of hitting ₹ 28 cr – ₹ 30 cr today [Day 10]… [Week 2] Fri 19.15 cr, Sat 24.80 cr. Total: ₹ 141.25 cr. #India biz. pic.twitter.com/zYB0L6RiOj
— taran adarsh (@taran_adarsh) March 20, 2022
‘द काश्मीर फाईल्स’ची कमाई-
शुक्रवार- 3.55 कोटी रुपये
शनिवार- 8.50 कोटी रुपये
रविवार- 15.10 कोटी रुपये
सोमवार- 15.05 कोटी रुपये
मंगळवार- 18 कोटी रुपये
बुधवार- 19.05 कोटी रुपये
गुरुवार- 18.05 कोटी रुपये
शुक्रवार- 19.15 कोटी रुपये
शनिवार- 24.80 कोटी रुपये
एकूण- 141.25 कोटी रुपये
‘द काश्मीर फाईल्स’ ने आमिर खानच्या दंगललाही मागे टाकलंय. दंगलपेक्षाही ‘द काश्मीर फाईल्स’ची कमाई अधिक आहे.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर यांसह इतरही नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा दाखवण्यात आली आहे. प्रभासचा ‘राधेश्याम’ आणि आलिया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ यांसारख्या मोठ्या बजेटच्या चित्रपटांचाही त्यावर परिणाम झाला नाही. अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपटसुद्धा 18 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे.
संबंधित बातम्या