मुंबई : विषय कोणताही असो विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे आपले मत मांडताना फार विचार करत नाहीत. काही दिवसांपूर्वीच विवेक अग्निहोत्री यांनी प्रकाश राज यांच्यावर निशाणा साधला होता. एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी प्रकाश राज यांना खडेबोल सुनावले होते. पठाण चित्रपटाच्या यशानंतर शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचे काैतुकही करताना विवेक अग्निहोत्री हे दिसले. एका पोस्टमध्ये विवेक अग्निहोत्री म्हणाले की, पठाण चित्रपटाच्या यशासाठी मी शाहरूख खान याचे काैतुक करतो. कारण त्याने पठाण चित्रपटाची (Movie) संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. विशेष म्हणजे पठाण चित्रपटाचे फार काही प्रमोशन करताना शाहरूख खान हा दिसला नाही.
नुकताच विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमुळे ते प्रचंड चर्चेत आहेत. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या निशाण्यावर दुसरे तिसरे कोणी नसून चक्क प्रियंका गांधी आहेत. यावेळी त्यांनी चक्क प्रियंका गांधीवर टिका केलीये. इतकेच नाहीतर करण जोहर याच्या चित्रपटामध्ये काम करण्याचा सल्ला देखील देऊन टाकलाय.
आता विवेक अग्निहोत्री यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. प्रियंका गांधीने दिल्लीत सत्याग्रहाला संबोधित केले होते. यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या की, माझ्या कुटुंबाने या देशात लोकशाही टिकवण्यासाठी आपले रक्त सांडले आहे. या देशातील लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही काहीही करू…आजपर्यंत आमच्या कुटुंबाचा अपमान करण्यात आलाय. मात्र, यापुढे हे अजिबात सहन केले जाणार नाहीये. तुम्ही एखाद्या व्यक्तीचा किती जास्त अपमान कराल?
Family… family…. Family… What have you done? Family se itna fake pyaar hai to I’d suggest it’s time Gandhis start acting in Karan Johar films. At least, family ecosystem to match karega. Kya pata KJo ko bhi le doobein. https://t.co/Tss4s27U4B
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) March 26, 2023
आता यावरच विवेक अग्निहोत्री यांनी पोस्ट लिहिली आहे. विवेक अग्निहोत्री म्हणाले की, परिवार… परिवार…परिवार…आपण काय केले आहे? तुम्हाला परिवारबद्दल इतके जास्त फेक प्रेम आहे…त्यामुळे मी तुम्हाला एक मोठा एक सल्ला देतो की, तुम्ही करण जोहर याच्या चित्रपटामध्ये काम करायला हवे…करण जोहर देखील अशाप्रकारच्या परिवारांवर आधारितच चित्रपट तयार करतो….तुम्ही करण जोहर यालाही बुडवाल…आता विवेक अग्निहोत्री यांची हिच पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.
विवेक अग्निहोत्री यांची ही पोस्ट अनेकांच्या पचनी पडली नसल्याची दिसत आहेत. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. या पोस्टमुळे विवेक अग्निहोत्री प्रचंड चर्चेत आहेत. काहीजण विवेक अग्निहोत्री यांच्या या पोस्टचे समर्थन करताना देखील दिसत आहेत. या पोस्टनंतर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर विवेक अग्निहोत्री आले आहेत.