मुंबई : शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. चित्रपटामधील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यापासून मोठा वाद सुरू आहे. अनेकांनी हे गाणे रिलीज झाल्यावर टीका केली. या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वादाला तोंड फुटले आहे. याच चित्रपटामधील दुसरेही गाणे काही दिवसांपूर्वीच रिलीज झाले असून या गाण्यावर म्हणावी तेवढी टीका होत नाहीये. परंतू अनेकजण पठाण या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने करताना दिसत आहेत.
आता पठाणच्या वादामध्ये थेट विवेक अग्निहोत्री यांनी उडी घेतलीये. विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. यामध्ये त्यांनी पठाण चित्रपटामधील बेशर्म रंग या गाण्यासोबत एक मेसेज व्हिडिओ देखील टाकला आहे, ज्यामध्ये एक मुलगी चित्रपटांमधील अश्लील गोष्टींबद्दल बोलताना दिसत आहे.
चित्रपट निर्मात्यांनी पैशासाठी अश्लील सामग्री, भाषा आणि वेशभूषेचा प्रचार करणे चुकीचे असल्याचे देखील या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. हे सर्वकाही देशामध्ये रेपच्या संस्कृतीला प्रोत्साहन देते, असल्याचे शेवटी व्हिडीओमधील ती मुलगी म्हणते.
WARNING:#PnV video against Bollywood. Don’t watch it if you are a Secular. pic.twitter.com/7wKPX4A8Ev
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) December 28, 2022
ही पोस्ट शेअर करताना विवेक अग्निहोत्री यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, वॉर्निंग- बॉलिवूडच्या विरोधात… जर तुम्ही सेक्युलर आहात तर हे पाहून नका. आता विवेक अग्निहोत्री यांची हिच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
पठाण चित्रपटाच्या समस्यांमध्ये सातत्याने मोठी वाढ होताना दिसत आहे. सोशल मीडियावर लोकांचा पठाण चित्रपटाच्याविरोधात रोष वाढत आहे. अनेकांनी या चित्रपटामुळे शाहरुख खान याला जीवे मारण्याचा धमाक्या देखील दिल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच विवेक अग्निहोत्री आणि अनुराग कश्यप यांच्यामध्ये सोशल मीडियावर मोठा वाॅर सुरू होता. अनुराग कश्यप यांनी पुष्पा आणि कांताका यासारख्या चित्रपटांवर निशाना साधत म्हटले होते की, या चित्रपटांमुळे बाॅलिवूडचे नुकसान होत आहे. यावर विवेक अग्निहोत्री यांनी जोरदार उत्तर दिले होते.