मुंबई : विवेक अग्निहोत्री आणि वाद हे समिकरण फार पुर्वीपासून सुरू आहे. बाॅलिवूड चित्रपटांशी संबंधित कोणताही मुद्दा असो यामध्ये विवेक अग्निहोत्री भाष्य करतात म्हणजे करतातच. काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्री आणि अनुराग कश्यप यांच्यामध्ये सोशल मीडियावर एक वाॅर सुरू होता. अनुराग कश्यपने शेअर केलेल्या व्हिडीओवर विवेक अग्निहोत्री यांनी कमेंट केली होती. यावर जोरदार प्रतिउत्तर अनुराग कश्यपने दिले. विवेक अग्निहोत्री यांनी पठाण चित्रपटाच्याविरोधात एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी बाॅलिवूडला थेट इशारा देऊन टाकला होता. यामध्ये वरती पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे सुरू होते आणि एक मुलगी बाॅलिवूडच्या चित्रपटांमधील अश्लीलता यावर बोलत होती.
विवेक अग्निहोत्री यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला होता. मात्र, आता या व्हिडीओमुळे विवेक अग्निहोत्री यांनाच ट्रोल होण्याची वेळ आली. बेशर्म रंग गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे मोठा वाद सुरू आहे.
ट्रोलर्सने विवेक अग्निहोत्री यांची मुलगी मल्लिका अग्निहोत्री हिचे भगव्या बिकिनीवरील फोटो शेअर करत विवेक अग्निहोत्री यांना ट्रोल केले. कारण मल्लिका हिने देखील भगव्या रंगाची बिकिनी घालून फोटोशूट केले आहे.
एका युजर्सने विवेक अग्निहोत्री यांच्या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, दुसऱ्यांना ज्ञान देण्यापेक्षा स्वत: च्या कुटुंबाला देखील देत जा…विवेक अग्निहोत्री यांच्या मुलीचा भगव्या बिकिनीवरील फोटो सोशल मीडियावर आता तूफान व्हायरल होत आहे.