पुणे – अभिनेता सलमान खानला साप(Snake)ने दंश केल्याची घटना नुकतीच घडली आहे. यानंतर त्याला MGM हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे. मात्र सलमान खानला चावलेला साप नेमका कोणता यावर खलबत सुरु झाली आहे. सद्यस्थितीला सलमान खान याची तब्येत ठीक आहे. सर्पदंश झाल्यानंतर त्याच्यावर तात्काळ रुग्णालयात दाखल करत उपचार करण्यात आले.
सलमान खानाला कोणता साप चावला
अभिनेता सलमान खानला बिनविषारी साप चावला असून तो रँड स्नेक किंवा वूल्फ स्नेक असू शकतो. बिनविषारी सापाची अशी कोणतीही लक्षणं नसतात. मात्र विषारी साप चावला तर मग मात्र ब्लॅक स्पॉट येणं, अंगावर पुरळ उटणं, मळमळणे व्हायला लागणे ही लक्षणं जाणवू लागतात.
अशी घ्या काळजी
मात्र साप चावल्यानंतर मांत्रिकाकडे न जाता शक्य होईल तेवढं लवकर थेट रुग्णालयात जाण्याचं आवाहन पुण्यातील सर्पमित्र अजय सोनवणे यांनी केलंय.
M.G.Mमध्ये उपचार
सलमान खानाला 25 डिसेंबरच्या रात्री सर्पदंश झाल्यानंतर त्याला तातडीने मदतीसाठी फोन केला. तात्काळ हालचाली करत त्याला नवी मुंबईच्या कामोठेतल्या M.G.M रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्याच्यावर उपचार करण्यात आले.
Rajasthan Crime: अल्पवयीन मुलीची प्रियकरासोबत आत्महत्या; राजस्थानातील घटना