मुंबई : लेखक आशिष कौल (Ashish Kaul) यांनी कंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्यावर कॉपीराईट उल्लंघनाचा आरोप केला होता. कोर्टात खोटे बोलल्याबद्दल आशिषने काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात कंगनाच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली होती.
आशिषचे वकील अदनान शेख आणि योगिता जोशी यांनी याप्रकरणी सांगितले की, आम्ही जावेद अख्तरजी यांना पत्र पाठवले होते आणि त्यांच्या उत्तरातून आम्हाला कळले की, पासपोर्ट अर्जासाठी नमूद केलेली तथ्ये अचूक नाहीत आणि हा एक मोठा गुन्हा आहे. आम्ही हा विषय उच्च न्यायालयात मांडू आणि गुन्हा सिद्ध झाल्यास त्याचा निकाल नक्कीच समोर येईल.
कंगनाने काही दिवसांपूर्वी ‘मणिकर्णिका रिटर्न्स : द लिजेंड ऑफ दिड्डा’ या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाची कथा ज्या पुस्तकावर आधारित आहे, त्याचे लेखन आशिष कौल यांनी केले आहे. आशिष यांनी कंगनावर कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप केला आहे आणि हे प्रकरण आता कोर्टात पोहोचले आहे.
या व्यतिरिक्त कंगना आणखी एका प्रकरणात चर्चेत आहे. वास्तविक, जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. कोर्टाने कंगनाला पुढील सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. खरं तर, पुढची सुनावणी 1 सप्टेंबरला होणार आहे आणि कोर्टाने इशारा दिला आहे की, जर ती कोर्टात हजर राहिली नाही तर तिच्याविरूद्ध अटकेचे वॉरंट बजावले जाईल. तर याचा अर्थ असा आहे की, सध्या बुडापेस्टमध्ये ‘धाकड’ चित्रपटाचे शूटिंग करणार्या कंगनाला ते मध्यातच सोडून भारतात यावे लागणार आहे. जर ती आली नाही, तर हे प्रकरण तिला भारी पडेल.
पासपोर्ट नूतनीकरण न झाल्याने कंगना शूटसाठी आधीच उशीरा पोहचली होती. मात्र, तोपर्यंत बाकीच्या सीनचे शूटिंग पूर्ण झाले होते. कंगना या चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. चित्रपटाचे शूटिंग अद्याप पूर्ण झालेले नाही आणि काम चालू आहे आणि अशा परिस्थितीत कंगना परत आली, तर पुन्हा चित्रपटाच्या टीमला कंगनाच्या परत येण्याची वाट पाहावी लागेल.
(Writer Ashish kaul filed contempt petition against Kangana Ranaut)
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखचं बोल्ड फोटोशूट, सोशल मीडियावर धुमाकूळ