Suniel Shetty ची ‘ही’ अभिनेत्री वयाच्या ५४ व्या वर्षीही एकटीच, राणी – काजोल यांच्यासोबत खास कनेक्शन

| Updated on: May 05, 2023 | 11:21 AM

‘ए जाते हुए लम्हों’ गाण्यातून प्रसिद्धीझोतात आलेली 'बॉर्डर' सिनेमातील ही अभिनेत्री आजही अविवाहित; झगमगत्या विश्वापासून दूर अभिनेत्री करते तरी काय?

Suniel Shetty ची ही अभिनेत्री वयाच्या ५४ व्या वर्षीही एकटीच, राणी - काजोल यांच्यासोबत खास कनेक्शन
Follow us on

मुंबई : ‘बॉर्डर’ सिनेमाला आजही कोणी विसरु शकलं नसेल. ‘बॉर्डन’ सिनेमा आजही प्रेक्षण तितक्याच आवडीने पाहतात. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ सिनेमाने चाहत्यांचं मनात राज्य केलं. दिग्दर्शक जे.पी.दत्ता दिग्दर्शित ‘बॉर्डन’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील तुफान कमाई केली. सिनेमात अक्षय खन्ना (Akshaye Khanna), सुनील शेट्टी (Suniel Shetty), जॅकी श्रॉफ (Jackie Shroff)आणि सनी देओल (Sunny Deol) यांसारख्या अभिनेत्यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. ‘बॉर्डन’ सिनेमा १९९७ सालचा सर्वात यशस्वी सिनेमा होता आणि ‘बॉर्डन’ सिनेमामुळे अनेक कलाकारांच्या लोकप्रियेत देखील मोठी वाढ झाली. सिनेमातील अभिनेत्री शरबानी मुखर्जी (Sharbani Mukherjee) हिने देखील चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

शरबानी मुखर्जी हिने ‘बॉर्डन’ सिनेमात अभिनेता सुनिल शेट्टी याच्या पत्नीची भूमिका साकारली होती. शरबानी मुखर्जी हिच्या सौंदर्याने चाहते घायाळ झाले. शरबानी मुखर्जी हिची आजही ‘ए जाते हुए लम्हों’ या गाण्यासाठी आठवण काढली जाते. शरबानी मुखर्जी हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेता समीर सोनी याच्यासोबत ‘घर आजा सोनिया’ या म्यूझीक व्हिडीओमध्ये काम केलं. प्रेक्षकांनी देखील शरबानी मुखर्जी हिला डोक्यावर घेतलं.

शरबानी मुखर्जी हिने फार कमी कालावधीत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. पण बॉलिवूडमध्ये आणि चाहत्यांच्या मनात अभिनेत्रीला स्वतःचं स्थान भक्कम करता आलं नाही. बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर चढत असताना अभिनेत्रीने मल्याळम सिनेविश्वाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. पण मल्याळम सिनेविश्वात अभिनेत्रीला यश मिळालं नाही.

हे सुद्धा वाचा

चित्रपट घराण्यातील असूनही शरबानी मुखर्जी बॉलिवूडमध्ये विशेष दर्जा मिळवू शकली नाही. शरबानी मुखर्जीच्या प्रोफेशनल लाईफबद्दल लोकांना माहिती आहे, पण या अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अनेकदा लाइमलाइटपासून दूर राहणाऱ्या या अभिनेत्रीने आता सिनेजगताला पूर्णपणे निरोप दिला आहे.

शरबानी मुखर्जी अभिनेत्री काजोल, तनिषा, राणी मुखर्जी आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांची चुलत बहीण आहे. मुखर्जी भावंड कायम दुर्गा पूजाच्या निमित्ताने एकत्र येतात. मल्याळम, तमिळ ते भोजपुरी सिनेमांमध्ये नशीब आजमावणारी शरबानी मुखर्जी वयाच्या ५४ व्या वर्षीही अविवाहित आहे.

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी लग्न केलं नाही. काही सेलिब्रिटींनी मुलांना दत्तक घेतलं, तर काही सेलिब्रिटी पैसा, प्रसिद्धी सर्व काही असूनही आजही एकटं आयुष्य जगत आहेत. अभिनेता सलमान खान, तब्बू, सुष्मिता सेन यांनी देखील लग्न केलेलं नाही.