बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी बरोबरी करणारा किंवा त्याच्या वडिलांची भूमिका करणारा तो एकमेव कलाकार होता. अमिताभ याचे गाजलेले शोले, त्रिशूल, मौसम, सवाल किंवा देवता हे चित्रपट पाहा. त्यात अमिताभ याच्या तोडीचा अभिनय करून या कलाकाराने आपले नाव अजरामर केले. त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये या कलाकाराने वृद्ध व्यक्तीची भूमिका केली. हा कलाकार होता सर्वांचा आवडता हरिभाई म्हणजेच अभिनेता संजीव कुमार. लहान वय असूनही त्याने आपल्या कारकिर्दीत मोठ्या व्यक्तींच्या भुमका केल्या. यावर एका मुलाखतीमध्ये उत्तर देताना ते म्हणाले होते. ”माझे आयुष्य कमी आहे. मी जास्त काळ जगणार नाही. त्यामुळे ज्या भूमिका समोर येत त्या करतो. जेणेकरून मी असे जीवन जगू शकेन जे अन्यथा माझ्याकडे नसेल.” जणू काही कमी आयुष्याची त्याला चाहूल लागली होती.
संजीव कुमार याने गुजराती रंगमंचावर खूप काम केले होते. त्यानंतर ते आयपीटीएमध्ये दाखल झाले. ज्येष्ठ अभिनेते ए. के. हंगल हे थिएटरमध्ये काम करत होतो. त्यावेळी संजीव कुमार त्यांच्यकडे कामासाठी आले होते. त्यांनीच संजीव कुमार यांना एका नाटकात वृद्ध व्यक्तीची भूमिका दिली होती. हिंदी रंगभूमीवरील संजीव कपूर यांची ती पहिली एन्ट्री होती. थिएटर आयकॉन शौकत आझमी (शबाना आझमी यांची आई) यांच्या पतीची भूमिका त्यांनी साकारली. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे 20 वर्ष. ही भूमिका लोकांना आवडली. कदाचित तेव्हापासून लोकांनी तो वृद्ध पात्रे अधिक चांगल्या प्रकारे साकारू शकतो हे मान्य केले होते.
संजीव कपूर यांची शोलेमधील ठाकूरच्य भूमिकेने एका वेगळा ठसा उमटविला. त्यावेळी संजीव कपूर यांचे वय 37 वर्ष होते. तर, त्रिशूलमध्ये अमिताभ बच्चनच्या (विजय कुमार) आणि शशी कपूरच्या (शेखर कुमार) वडिलांची भूमिका साकारली तेव्हा ते 40 वर्षांचे होते. अभिनेता परेश रावल यांनी संजीव कुमार : द ॲक्टर वुई ऑल लव्हड या पुस्तकामध्ये त्यांची आठवण सांगताना म्हणतात. संजीव कुमार यांचे व्यवस्थापक जमनादास यांच्याशी बोललो तेव्हा ते म्हणाले, ”परेश, तुम्हाला अमिताभ बच्चनचे वडील व्हायचे असेल तर ते फक्त संजीव कुमारच होऊ शकतात! आणखी कोण बनणार?”
संजीव कपूर यांना मोठ्या माणसांच्या भूमिका आवडत असल्या तरी इंडस्ट्रीने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. अभिनेता म्हणून ते प्रत्येक गोष्टीत सर्वोत्कृष्ट होते. अंगूर, ट्रिश, टॉय आणि पति पत्नी और वो हे चित्रपट त्यांच्या अष्टपैलुत्वाचा पुरावा आहेत. हॉलिवूड अभिनेता फिलिप सेमोर हॉफमन याच्याशीही त्याची तुलना केली गेली होती. अनेक चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता आणि त्यांनीही सर्वात आव्हानात्मक मुख्य भूमिका तसेच पात्र भूमिका तितक्याच धैर्याने स्वीकारल्या.
अभिनेता म्हणून संजीव कुमार यांनी फार कमी कालावधीत अनेक कामगिरी आपल्या नावावर केल्या. 1981 मध्ये आलेल्या चेहरे पे चेहरा या चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीत कृत्रिम मेकअप सादर करणारे ते पहिले अभिनेते होते. 1974 च्या ‘नया दिन नई रात’ चित्रपटात नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारणारे ते पहिले अभिनेते होता. एका मुलाखतीमध्ये त्यांना लहान वयात वृद्ध वयाच्या व्यक्तींच्या भूमिका का करता असे विचारले असता ते म्हणाले, एका हस्तरेखाकाराने भाकीत केले होते की मी जास्त काळ जगणार नाही. माझे आयुष्य जास्त नाही. मी त्या वयाचा होणार नाही. त्यामुळे चित्रपटांमध्ये वयस्कर भूमिका करून ते आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहे. जे माझ्याकडे नाही, नसेल ते क्षण जगण्याचा प्रयत्न मी माझ्या भूमिकांमधून करत आहे.” असे उत्तर त्यांनी दिले होते.