Pathaan Box Office collection : अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमा गेल्या १२ दिवसांपासून भारतामध्येच नाही तर, जगभरात नवीन विक्रम रचताना दिसत आहे. पण प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला गोळा करणाऱ्या पठाण सिनेमाचा बोलबाला आता कमी झालेला दिसत आहे. दुसऱ्या आठवड्याच्या सोमवारी सिनेमाच्या कमाईत मोठी घट झाली आहे. प्रदर्शनानंतर सिनेमाने पहिल्यांदा एका आकड्यामध्ये कमाई केली आहे. म्हणून चाहत्यांच्या मनात असलेली सिनेमाची क्रेझ कमी झाली का असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.
ट्रेड विश्लेषक रमेश बाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पठाण सिनेमाने दुसऱ्या आठवड्याच्या सोमवारी ८ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. भारतात पठाण सिनेमाने आतापर्यंच ४२२ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सध्या सर्वत्र पठाण सिनेमाची चर्चा कमी झाल्यामुळे आता पुढच्या काही दिवसांत प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी बॉक्स ऑफिसवर गर्दी करतील की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पठाण सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर १३ व्या दिवशी फक्त ८ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. पण पठाण भारतात तिसऱ्या आठवड्यात ४५० कोटी रुपयांचा गल्ला जमा करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सिनेमा तिसऱ्या आठवड्यात ४५० कोटी रुपयांचा गल्ला जमा करतो की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
#Pathaan early estimates for 2nd Monday All-India Nett is ₹ 8 Crs..
— Ramesh Bala (@rameshlaus) February 7, 2023
पठाण सिनेमाने दुसऱ्या आठवड्यात शुक्रवारी १३.५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. शनिवारी सिनेमाने २२.५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. त्यानंतर रविवारी सिनेमाने तब्बल २८ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. तर दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने जवळपास एकून ६४ कोटी रुपयांची कमाई केल्याचं सांगण्यात येत आहे. शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमा साऊथमध्ये चांगली कामगिरी करताना दिसत आहे.
भारतात आतापर्यंत सिनेमाने ४२२ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. तर जगभरात सिनेमाने ८५० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. तर येत्या काही दिवसांत सिनेमा १००० कोटी रुपयांपर्यंत मजल मारे असं सांगण्यात येत आहे.
चार वर्षांपूर्वी शाहरुख २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. चार वर्षांनंतर अभिनेत्याला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्याने ‘पठाण’ सिनेमाचं प्रमोशन देखील केलेलं नाही. पण ट्विटरवर #askSRK सेशनच्या माध्यमातून अभिनेता थेट चाहत्यांच्या संपर्कात होता.