वाह! मंत्रमुग्ध करणारा आवाज, कमाल आहे हा मुलगा…

| Updated on: Dec 22, 2022 | 6:31 PM

आपल्या सर्वांना माहित आहे की भारतात प्रतिभेची कमतरता नाही आणि व्हायरल होणारा हा व्हिडिओ हे सिद्ध करतो.

वाह! मंत्रमुग्ध करणारा आवाज, कमाल आहे हा मुलगा...
train viral video boy singing
Image Credit source: Social Media
Follow us on

रेल्वे प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर रेल्वे सारखा प्रवास नाही. बरेचदा प्रवासात असं काही घडतं की प्रत्येक आपला प्रवास जबरदस्त होतो. कुणी प्रवासी मनोरंजक असतो. कुणी अतरंगी असतो. प्रवास होत राहतो लोक भेटत राहतात. आपल्या सर्वांना माहित आहे की भारतात प्रतिभेची कमतरता नाही आणि व्हायरल होणारा हा व्हिडिओ हे सिद्ध करतो. वाराणसीतील काशी तमिळ संगममहून परतणाऱ्या ट्रेनमधील प्रवाशांसाठी 8 वर्षीय मुलाची गाणं गातानाची क्लिप व्हायरल झाली आहे. या मुलाने कोणतेही गाणे गायले नाही परंतु आपल्या शास्त्रीय संगीताच्या सादरीकरणाने सर्वांना चकित केले आणि आजूबाजूला बसलेल्या प्रवाशांना मोहित केले.

व्हिडीओमध्ये व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये सूर्यनारायण असं या मुलाचं नाव आहे. तो अवघ्या आठ वर्षांचा असून ट्रेनच्या वरच्या बाजूला बसून आपल्या सुरेल आवाजात शास्त्रीय संगीत गाताना दिसत आहे.

व्हिडिओ पाहून असं दिसतं की, हे मूल इतर प्रचंड गर्दीच्या ठिकाणी बसलंय. लोक त्याच्या गाण्याचा आनंद घेत आहेत. या मुलाचा आवाज ऐकल्यानंतर तुमचा आत्मा नक्कीच तृप्त होईल.

परफॉर्मन्सदरम्यान मुलाच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य आणि आत्मविश्वास पाहण्यासारखा असतो. तो गाताच त्याच्यासोबत ट्रेनमधले इतर लोकही गातात आणि त्याला प्रोत्साहन देतात.

हा व्हिडिओ @VarierSangitha नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला १.१८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि त्यावर कमेंट केल्या जात आहेत.