मुंबई- ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) या बिग बजेट चित्रपटाचा टीझर अयोध्येत संपूर्ण टीमकडून लाँच करण्यात आला. सोशल मीडियावर जेव्हा हा टीझर प्रदर्शित झाला, तेव्हा त्यावरून विविध प्रतिक्रियांचा वर्षाव होऊ लागला. रामायणाच्या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या टीझरमधील अनेक मुद्द्यांवरून नेटकऱ्यांनी आक्षेप नोंदविला आहे. आधीच ट्विटरवर बॉलिवूड चित्रपटांविरोधात ‘बॉयकॉट’चा ट्रेंड (Boycott Trend) सुरू होता. आता आदिपुरुषचा टीझर येताच बॉयकॉटची संपूर्ण गँगच तुटून पडली आहे. सोमवारपासून ट्विटरवर ‘बॉयकॉट आदिपुरुष’चा ट्रेंड जोरदार सुरू झाला. यावेळी नेटकऱ्यांनी एक किंवा दोन नाही तर बॉयकॉटच्या कारणांची यादीच मांडली आहे.
या चित्रपटात प्रभासने राम, सैफ अली खानने रावण आणि क्रिती सनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे. यातील रावणाच्या भूमिकेवरून नेटकऱ्यांनी दिग्दर्शक ओम राऊतला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘रावण आहे की अल्लाउद्दीन खिल्जी’ अशा शब्दांत लूकवरून टीका होऊ लागली.
Presenting you guys all the desi versions of hit Hollywood movies & series…. ?#Adipurush #DisappointingAdipurish #Prabhas? #SaifAliKhan #HouseOfDragon #HouseOfTheDragonHBO pic.twitter.com/HcbpzLUHPB
— ?????????…. ?? (@_socialvegan) October 3, 2022
चित्रपटातील VFX वरूनही प्रेक्षकांची निराशा झाली. गेम ऑफ थ्रोन्स, ॲक्वामॅन, राइज ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांमधून काही सीन्स कॉपी केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला.
Upcoming Hollywood movie poster ?#Adipurush pic.twitter.com/t7Gn7crrJJ
— Sk farhan (@skfarhan6511) October 3, 2022
Reality of Bollywood!#BoycottAdipurush pic.twitter.com/xrUep3IuGu
— Dr Sujin Eswarॐ?? (@DrSujinEswar1) October 4, 2022
लंकेश रावणच नाही तर हनुमानाचं चित्रणही चुकीच्या पद्धतीने केल्याची तक्रार नेटकऱ्यांनी केली आहे. दाढी आणि केसांच्या स्टाइलमुळे ते मुघल शासकांसारखे दिसत असल्याचा टोला काही युजर्सनी लगावला आहे. जवळपास पावणे दोन मिनिटांच्या या टीझरमधल्या अनेक गोष्टी नेटकऱ्यांना खटकल्या.
आदिपुरुषमध्ये सनी सिंह हा लक्ष्मणाची भूमिका साकारतोय. 12 जानेवारी 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र त्यापूर्वीच नेटकऱ्यांची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.