Salman Khan: अभिनेता सलमान खान याने त्यच्या करियरमध्ये अनेक हीट सिनेमे दिले आहेत. पण सलमान खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. खासगी आयुष्यात सलमान खान कायम दुसऱ्यांची मदत करताना दिसतो, तर कधी गरजेच्या वेळी मित्रांसाठी धावताना दिसतो. अनेक सेलिब्रिटी सलमान खान याचं कौतुक करताणा देखील दिसतात. अशाच एका भाईजानच्या मित्रांपैकी एक म्हणजे, टिम लॉरेन्स…. टिम लॉरेन्स हा ब्रिटिश अभिनेता असून, त्याने अनेक सिनेमांमध्ये सलमान खान याच्यासोबत स्क्रिन शेअर केली आहे.
टिम लॉरेन्स हा फक्त सलमान खान याचाच नाही तर अभिनेता सोहैल खान याचा देखील खास मित्री आहे. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वीर’ सिनेमात सलमान, सोहैल आणि लॉरेन्स यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. शिवाय 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्राउड टू बी इंडियन’ सिनेमात देखील लॉरेन्स याने सोहैल खान याच्यासोबत स्क्रिन शेअर केली. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोन्ही खान भावांची ओळख टिम लॉरेन्स सोबत झाली.
‘वीर’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना लॉरेन्सने मैत्रीचं कारण सांगितलं होतं. ‘सलमान खान अधिक फिटनेस फ्रिक असल्यामुळे आमच्यातील मैत्री घट्ट झाली…’ एवढंच नाही तर, सलमान खान आणि सोहैल खान यांच्याबद्दल देखील लॉरेन्सने वक्तव्य केलं होतं.
‘भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये दोघांपेक्षा उत्तम को-स्टार नाही मिळू शकत…’ सलमान खान बद्दल लॉरेन्स म्हणाला, ‘सलमान फक्त दिसायला चांगला नाही तर, त्याचा स्वभाव देखील चांगला आहे. तो एक उत्तम व्यक्ती आहे…’, सलमान खान याला धमकी मिळाल्यापासून त्याच्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या.
गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खान याला जीवेमारण्याची धमकी मिळत आहे. म्हणून अभिनेत्याच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खान याचे खास मित्र आणि ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या मारून हत्या करण्यात आली.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याला देखील धमकी देण्यात आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणते जो कोणी सलमान खानची मदत करेल, त्याने स्वतःचा हिशेब करून ठेवावा… अशी पोस्ट करत गुंड लॉरेन्स बिश्नोई याने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.