मुंबई : दक्षिण कोरिया(South Korea)चा बॉय बँड बीटीएस (BTS) जगात सर्वात प्रसिद्ध आहे. हा बँड बीटीएस फॅन आर्मी (BTS Army) म्हणून ओळखला जातो. बँडनं आपल्या चाली आणि ट्रॅकनं संपूर्ण जगाला वेड लावलंय. या बँडची फॅन फॉलोइंग केवळ दक्षिण कोरियातच नाही तर भारतातही आहे. नवीन वर्ष आपल्यापासून काही पावलं दूर आहे. अशा स्थितीत बीटीएसला चाहत्यांना मिळालेल्या प्रेमासाठी सरप्राइज द्यायचं आहे.
‘नवीन वर्षात आर्मीसाठी बीटीएस सरप्राइझ’
बॉय बँडच्या अधिकृत ट्विटर हँडलनं नुकतीच एक पोस्ट शेअर केलीय. बीटीएसचे कलाकार त्यांचं कलेक्शन दाखवतील असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यामध्ये बँडचे सदस्य आपली रचना सादर करतील. त्याचं कॅप्शनही त्यांनी असं काहीस लिहिलंय..
जानेवारी 2022साठीचा प्रोग्राम केला जाहीर
बँडनं जानेवारी 2022साठी आपला कार्यक्रम जारी केलाय. बँडच्या प्रत्येक सदस्यानं त्यांचं चार दिवसांचं शेड्यूल जारी केलंय. शेड्युलच्या पहिल्या दिवशी प्रत्येक सदस्य त्यांचा फोटो शेअर करेल. कलाकारांनी बनवलेल्या या कलेक्शनमध्ये, प्रत्येक सदस्य त्याचं प्रॉडक्ट दाखवेल आणि लोगोचा प्रिव्ह्यूदेखील समाविष्ट करेल.
चाहते पाहतायत वाट
लॉस एंजेलिसमधील ‘परमिशन टू डान्स ऑन स्टेज डान्स कॉन्सर्ट’मध्ये बीटीएसला शेवटचं लाइव्ह परफॉर्म करताना आपण पाहिलं होतं. सदस्यांनी चार दिवसांच्या परफॉर्मन्सनं इतिहास रचला. प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. कार्यक्रमानंतर लगेचच, बँडनं सुट्टीसाठी ब्रेक जाहीर केला. कंपनीनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्याची अधिकृत माहिती दिली. ब्रेकदरम्यानदेखील, बीटीएस सदस्य त्यांच्या चाहत्यांसह त्यांच्या Instagram थेट चॅटदरम्यान खूप सक्रिय होते. तर चाहते 2022मध्ये बँडच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत.