महानायक अमिताभ बच्चन बॉलिवूडचे सुपरस्टार आहेत. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आजही चाहत्यांमध्ये बिग बी यांची क्रेझ फार मोठी आहे. म्हणून बिग बी यांच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आता देखील अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला बच्चन कुटुंबाच्या शेजारी राहायला जायचं असेल तर, तुम्ही अमिताभ बच्चन यांच्या शेजारी असलेला बंगला खरेदी करु शकता. सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन यांच्या शेजारी असलेल्या बंगल्याची चर्चा रंगली आहे.
नुकताच, ‘मनीकंट्रोल’ मधील एका अहवालात म्हटलं आहे की, अमिताभ बच्चन यांच्या जलसा या बंगल्याशेजारी एक बंगला विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. ड्यूश बँकेने या भव्य मालमत्तेचा 25 कोटी रुपयांना लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याची EMD रुपये 2.50 कोटी असेल. बंगला विक्रीसाठी असल्यामुळे बिग बी यांच्या शेजारी राहायला जाण्यासाठी मोठी संधी आहे.
सांगायचं झालं तर, बँका सहसा लिलावासाठी किंमती बाजार मूल्यापेक्षा काही प्रमाणात कमी ठेवतात, त्याचप्रमाणे, अमिताभ बच्चन यांच्या शेजारी असलेल्या या बंगल्याची किंमत 35-40 कोटी रुपये असू शकते. बंगला अमिताभ बच्चन यांच्या बंगल्या शेजारी असल्यामुळे ‘जलसा’ बंगल्याची देखील चर्चा रंगली आहे.
बिग बी कायम ब्लॉगमध्ये बंगल्याचे फोटो पोस्ट करत असतात. एक ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन ‘जलसा’ बंगल्यातील त्यांच्या आवडत्या जागेबद्दल सांगितलं होतं. ‘जलसा’ बंगल्यात एक रेकॉर्डिंग रुम आहे. बिग बी त्या रुमला ‘सप्तस्वर’ असं म्हणतात. रुममधील त्यांनी एक फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
‘जलसा’ बंगल्याप्रमाणेच इतर बंगले देखील अमिताभ बच्चन यांचे आहेत. बिग बी कुटुंबासोबत ‘जलसा’ बंल्यात राहतात. बिग बी दर रविवारी त्यांच्या घराबाहेर त्यांच्या चाहत्यांसाठी येतात आणि त्यांची भेट घेतात. हा भव्य बंगला 10,125 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेला आहे आणि त्याची किंमत 100-120 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
अमिताभ बच्चन लवकरच ‘सेक्शन 84’, ‘कल्कि 2898 – ऐ डी’, ‘आंखें 2’ आणि ‘तेरा यार हूं मैं’ सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात बिग बी मुख्य भूमिकेत दिसतील. चाहते देखील अमिताभ बच्चन यांना मोठ्या पडद्यावर पाहण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
बिग बी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी बिग बी कायम सोशल मीडियावर आणि ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संपर्क साधण्याच्या प्रयत्नात असतात.