मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : महानायक अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक सिनेमे केले आहेत. आजही त्यांच्या सिनेमांची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते. बिग बी यांनी फक्त सिनेमेच नाही तर, अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केलं आहे. ज्यामुळे अनेकदा अमिताभ बच्चन यांना टीकेचा देखील सामना करावा लागला आहे. याच संबंधी एक नवीन प्रकरण देखील समोर येत आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) अमिताभ बच्चन आणि फ्लिपकार्टवर टीका केली आहे. एवढंच नाही तर, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे (सीसीपीए) तक्रार करण्यात आली आहे. जाहिरात अनुचित व्यापार पद्धती आणि खोट्या तथ्यांनी भरलेली आहे.. असं तक्रारीत म्हणण्यात आलं आहे. याप्रकरणामुळे अमिताभ बच्चन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी CCPA कडून दाखल कण्यात आलेल्या तक्रारीवर वक्तव्य केलं आहे. ‘फ्लिपकार्टने अमिताभ बच्चन यांच्या माध्यमातून माबाईल किंमतींच्या बाबतीत ग्राहकांची दिशाभूल केली आहे. फ्लिकार्ड ज्या किंमतीत मोबाईलची विक्री करत आहेत, तेवढ्या किंमतीत व्यापारी करू शकत नाहीत. म्हणून हा व्यापाऱ्यांचा अपमान आहे असं देखील सांगण्यात येत आहे. एवढंच नाही तर, हे सरकारी नियमांच्या विरोधात देखील आहे.’
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी २०२२ मध्ये जारी केलेल्या नियम ४ नुसार, फ्लिपकार्टची ही जाहिरात दिशाभूल करणारी आहे. कारण त्यात खरे आणि प्रामाणिक प्रतिनिधित्व नाही आणि ती पूर्णपणे खोटी आहे. सध्या सर्वत्र फ्लिपकार्ट आणि अमिताभ बच्चन यांची चर्चा रंगली आहे.
फ्लिपकार्टच्या जाहिरातीला होणारा विरोध पाहता जाहिरात हटवण्याची मागणी भरतिया आणि खंडेलवाल यांच्याकडून करण्यात आली आहे. एवढंच नाही तर, भरतिया आणि खंडेलवाल यांनी खोट्या किंवा दिशाभूल करणार्या जाहिरातींसाठी CPA च्या कलम ८९ नुसार फ्लिपकार्टवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जाहिरात ग्राहकांची दिशाभूल करणारी असल्यामुळे, दोन वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाखांचा दंड ठोठावण्यात यावा, तर महानायक अमिताभ बच्चन यांना देखील १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा असं मागणी देखील भरतिया आणि खंडेलवाल यांच्याकडून करण्यात आली आहे. शिवाय खंडेलवाल यांनी बिग बी यांच्यावर नाराजी देखील व्यक्त केली आहे.