Marathi News Entertainment Can you guess this actress who became internet sensation overnight with on video most searched national crush
अवघ्या 26 सेकंदांच्या व्हिडीओमुळे रातोरात बनली स्टार; गुगलवर तरुणांकडून सर्वाधिक सर्च केलेली ही अभिनेत्री कोण?
अवघा 26 सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि रातोरात तिला प्रसिद्धी मिळाली. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम.. सर्वत्र तीच ट्रेंड होऊ लागली होती. फोटोतील या अभिनेत्रीला ओळखलंत का? तिला गुगलवर सर्वाधिक सर्च केलं गेलं होतं. नॅशनल क्रश म्हणूनही ती ओळखली जायची.
1 / 6
नशीब आपल्यावर कधी मेहरबान होईल, हे सांगता येत नाही असं म्हणतात. असंच काहीसं या अभिनेत्रीसोबत घडलं. अवघ्या 26 सेकंदांच्या एका व्हिडीओने या मुलीचं नशीब रातोरात पालटलं. या व्हिडीओमुळे ती सोशल मीडिया सेन्सेशन ठरली होती. तेव्हापासूनच ही अभिनेत्री 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाते.
2 / 6
अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हे नाव तुम्ही एकदा तरी ऐकलंच असणार. डोळा मारण्याच्या एका व्हिडीओने तिला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली होती. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तिचा मोठा चाहतावर्ग आहे. प्रियाने नुकतंच केलेलं हे फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे.
3 / 6
2018 मध्ये 'ओरु अदार लव्ह' या चित्रपटातील एक सीन सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला होता. त्यामध्ये शाळेच्या गणवेशात दिसणारी प्रिया एका मुलाला डोळा मारताना दिसली होती. तिची ही स्टाइल इतकी लोकप्रिय झाली की लोक तिला 'विंक गर्ल' असंच म्हणू लागले.
4 / 6
यानंतर पुढच्या चित्रपटासाठी तिला थेट मुख्य भूमिकाच मिळाली. प्रियाचा जन्म 28 ऑक्टोबर 1999 रोजी केरळमधल्या त्रिशूर इथं झाला. मल्याळमशिवाय प्रियाने इतरही भाषांमध्ये काही भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये विष्णुप्रिया, श्रीदेवी बंगलो आणि यारियाँ 2 यांचा समावेश आहे.
5 / 6
यारियाँ 2 या चित्रपटात प्रियासोबत दिव्या खोसला कुमार, पर्ल वी पुरी आणि यश गुप्ता यांच्याही भूमिका आहेत. प्रिया इन्स्टाग्रामवर फार लोकप्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर तब्बल 76 लाख फॉलोअर्स आहेत. प्रियाचा हा नवीन फोटोशूट सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
6 / 6
प्रियाच्या 'ओरु अदार लव्ह' या चित्रपटातील गाण्याचं तेलुगू व्हर्जन जेव्हा प्रदर्शित झालं होतं, तेव्हा त्यातील एका किसिंग सीनचीही तेवढीच चर्चा होती. या सीनमध्ये तिचा सहकलाकार रोशन अब्दुल राउफने तिला किस केल्याचं पहायला मिळालं होतं.