75 व्या आंतरराष्ट्रीय कान चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीचा (Nawazuddin Siddiqui) स्टायलिश अंदाज पहायला मिळाला. या महोत्सवाविषयी बोलताना नवाजुद्दीनने अप्रत्यक्षपणे RRR, केजीएफ 2, द काश्मीर फाईल्स यांसारख्या चित्रपटांवर निशाणा साधला.
'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "मी जेव्हा अभिनयक्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा एके दिवशी मी कान फेस्टिव्हलला जाईन असा विचारसुद्धा केला नव्हता."
"कान चित्रपट महोत्सव म्हणजे जणू सिनेमांचा मक्का. तिथे चारही बाजूंना फक्त चांगल्या सिनेमांचीच चर्चा होते, बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल तिथे कोणी बोलत नाही", असं तो पुढे म्हणाला.
"आपण ज्या कलेक्शनबद्दल बोलून बोलून सिनेमे पाहायला जातोय ना, तिथे त्यांची चर्चा होतच नाही", अशा शब्दांत त्याने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करणाऱ्या चित्रपटांना टोला लगावला.
नवाजुद्दीनने याआधीही कान चित्रपट महोत्सवात हजेरी लावली होती. "दरवर्षी माझ्या वाढदिवसाच्या तारखेदरम्यानच कान फेस्टिव्हल आयोजित केला जातो. मी वाढदिवस साजरा करणारा माणूस नाही. त्यामुळे मला त्याचं काही वाटत नाही," असंदेखील तो म्हणाला.