अल्लू अर्जुनविरुद्ध निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल, धक्कादायक घटनेत महिलेचा मृत्यू, Video समोर

| Updated on: Dec 06, 2024 | 11:20 AM

Pushpa 2 the Rule fame Allu Arjun: 'पुष्पा' फेम अभिनेता अल्लू अर्जुनच्या अडचणीत मोठी वाढ, अभिनेत्याविरोधात निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल, धक्कादायक घटनेत महिलेचा मृत्यू, घटनेचा व्हिडीओ पाहून म्हणाल...

अल्लू अर्जुनविरुद्ध निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल, धक्कादायक घटनेत महिलेचा मृत्यू, Video समोर
Follow us on

Pushpa 2 the Rule fame Allu Arjun: ‘पुष्पा 2’ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर यश मिळत आहे, तर दुसरीकडे अभिनेता अल्लू अर्जुन याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अभिनेत्याच्या विरोधात निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबादमध्ये 4 डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’ सिनमाच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त त्याच्या सुरक्षा एजन्सी आणि संध्या थिएटरवर गैरवर्तनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगण्यात येत आहे की, अल्लू अर्जुन 4 डिसेंबर रोजी हैदराबाद येथील संध्या चित्रपटगृहाबाहेर पोहोचला होता. ‘पुष्पा 2’ सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी अभिनेता चित्रपटगृहाबाहेर पोहोचला होता. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी जमली आणि सर्वांची पळापळ सुरु झाली.

 

 

रिपोर्टनुसार, चाहत्यांची चित्रपटगृहात घुसण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे चित्रपटगृहात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. लोकांना श्वास घेण्यासाठी देखील त्रास होऊ लागला होता. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला. पण परिस्थीती हाता बाहेर गेली होती. चेंगराचेंगरीत अनेक लोकं बेशुद्ध देखील झाली. अनेकांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं. पण याचदरम्यान एका महिलेचा मृत्यू झालाय.

 

 

मृत महिलेचं नाव रेवती, मुलाचं प्रकृती गंभीर…

मृत महिलेचं नाव रेवती असं असून ती 39 वर्षांची होती. रेवती पती आणि दोन मुलांसोबत ‘पुष्पा 2’ सिनेमा पाहण्यासाठी गेली होती. मात्र अल्लू अर्जुन चित्रपटगृहात पोहोचताच चाहत्यांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि अभिनेत्याला पाहण्यासाठी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये महिलेला आपला जीव गमवावा लागला. मुलगा अजूनही रुग्णालयात असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.