Casting Couch Chats Leaked: झगमगत्या विश्वात आतापर्यंत अनेक महिलांनी कास्टिंग काऊच सारख्या वाईट प्रसंगाचा सामना केला आहे. आता देखील सोशल मीडियावर एक स्क्रिनशॉट तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती कामाच्या बदल्यात अभिनेत्रीकडे शारीरिक संबंधांची मागणी करताना दिसत आहे. सांगायचं झालं तर टीव्ही अभिनेता मोहित परमार याने त्याच्या मैत्रिणीसोबत घडलेल्या घटनेची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. दोघांमधील चॅटचे स्क्रिनशॉट देखील शेअर केले आहेत. अभिनेत्याची मैत्रीण प्रेरणा ठाकूर हिच्यासोबत ही धक्कादायक घटना घडली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्याने त कास्टिंग कोऑर्डिनेटरच्या नावाचा देखील खुलासा केला आहे. शिवाय अभिनेत्याने इतर तरुणींना सावध राहण्यास देखील सांगितलं आहे.
मोहित याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये प्रेम मल्होत्रा नावाच्या एका व्यक्तीने प्रेरणा ठाकूर हिच्याकडे कामाच्या बदल्यात सेक्सची मागणी केली आहे. सध्या स्क्रिनशॉट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्याने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्याने इतर तरुणींना सावध केलं आहे.
पोस्ट शेअर करत मोहित म्हणाला, ‘या कास्टिंग कोऑर्डिनेटरपासून सावध राहा… तो कायम अभिनेत्रींना त्रास देत असतो आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठा बळजबरी करत असतो… जर हा माणूस तुम्हाला कास्टिंगसाठी अप्रोच करत असेल किंवा कोणत्या ऑडिशनच्या ग्रूपमध्ये तुम्हाला हा माणूस दिसल्यास त्याला लगेच ब्लॉक करा किंवा त्याच्या विरोधात तक्रार दाखल करा…’ असं देखील अभिनेता पोस्टमध्ये म्हटला आहे.
सांगायचं झालं तर, आतापर्यंत अनेक अभिनेत्री कास्टिंग काऊचा वाईट अनुभव अनुभवला आहे. पूर्वी अभिनेत्री यावर अधिक बोलायच्या नाहीत, पण आता अभिनेत्री आलेले अनुभव चाहत्यांना सांगत असतात. धक्कादायक गोष्ट म्हणजे कास्टिग काऊचमुळे अनेक अभिनेत्री इंडस्ट्रीचा निरोप घेतला.
इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊचचा अनुभव फक्त अभिनेत्रींनाच नाही तर, अभिनेत्यांना देखील आला आहे. सेलिब्रिटी कायम कास्टिंग काऊचबद्दल बोलताना दिसतात.