‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेत सेलिब्रिटी किरण गायकवाडची एण्ट्री

| Updated on: May 20, 2024 | 5:15 PM

संदीप जाधव निर्मित 'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेचे संवाद तेजपाल वाघ यांनी लिहिले असून स्वप्नील गांगुर्डे यांनी कथा, पटकथा लिहिली आहे. भिन्न स्वभावाची अनोखी प्रेम कहाणी 18 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

कॉन्स्टेबल मंजू मालिकेत सेलिब्रिटी किरण गायकवाडची एण्ट्री
'कॉन्स्टेबल मंजू'
Image Credit source: Instagram
Follow us on

सध्या अनेकांच्या घराघरांत, आवडत्या मालिकांमध्ये लग्नसराई चालू आहे. नवरा-नवरी नटून होऊन तयार आहेत. आई-वडील आणि इतर नातेवाईक लग्नाची तयारी कुठपर्यंत आली याकडे लक्ष देत आहेत. खास मित्र मंडळी ‘मेरे यार की शादी है’ या मूडमध्ये आहेत. हे प्रसंग प्रत्येक घराघरात दिसत आहे. आता लवकरच ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेतसुद्धा प्रेक्षकांना लग्न समारंभ पाहायला मिळणार आहे. सत्या आणि मंजूच्या लग्नाच्या निमित्ताने या मालिकेत सेलिब्रिटीची एण्ट्री होणार आहे. ज्याला बघता क्षणी लग्नात उपस्थित पाहुणे त्याच्या मागे लागणार आहेत. तो मित्र म्हणजे सत्याचा सच्चा मित्र अभिनेता किरण गायकवाड. त्याच्या येण्याने लग्न समारंभ विशेष गाजणार आहे.

एकीकडे सत्या आणि मंजूच्या लग्नात पोलीस गुंड गण्या फिरंगीच्या शोध मोहिमेवर असतात. तर दुसरीकडे लोकप्रिय अभिनेता किरण गायकवाड पाहुणे मंडळींची नजर आपल्यावर पडू नये आणि थेट सत्याची भेट होऊन देत या हेतून स्वत:चा चेहरा लपवून सत्याच्या लग्नात येतो. आता पोलिसांच्या तावडीत भेटलेला किरणच्या बाबतीत नेमकं घडणार काय, पाहुण्यांसमोर किरणचा चेहरा सगळ्यांसमोर आल्यावर किरण काय करणार, हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागाप पहायला मिळेल.

हे सुद्धा वाचा

मित्र या नात्याने किरणची सत्यासाठी असलेली मैत्रीची जाणीव, आपुलकी प्रेक्षकांना नवीन एपिसोड्समध्ये दिसून येणार आहे. किरण गायकवाडची स्पेशल एण्ट्री, पोलिसांनी घेरलेल्या किरणची मस्ती, गंमत, सत्या आणि मंजूचं लग्न मिशन उर्फ लग्नसराई हे सर्व ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेमध्ये पहायला मिळणार आहे. मालिकेचा हा विशेष एपिसोड येत्या 20 मे ते 27 मे रोजी रात्री 8 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

18 मार्चपासून सुरु झालेल्या ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेत एका प्रसिद्ध राजकारण्याचा कार्यकारी सत्या जो निडर, बिनधास्त आणि रावडी आहे. त्याच्या नशिबात भित्री भागुबाई कॉन्स्टेबल मंजू येते. दोघांचेही स्वभाव एकमेंकाच्या अगदी उलट, पण नशिबाने त्यांची एकत्र गाठ बांधली आहे.