झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी महिलांना खासगी आयुष्यात अनेक चढ उतारांचा सामना करावा लागतो. इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक महिला आहेत, ज्यांना प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं पण खासगी आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला. एका सेलिब्रिटी महिलेने वयाच्या 13 व्या वर्षी 30 वर्षीय गुरुसोबत लग्न केलं. पण तिला नवऱ्याची साथ लाभली नाही. त्यानंतर तिच्या मुलीचं निधन झालं… सध्या ज्या महिलेच्या आयुष्याबद्दल चर्चा रंगली आहे, त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून दिवंगत बॉलिवूड कोरियोग्राफर सरोज खान आहेत… निधनानंतर देखील त्या कायम चर्चेत असतात. झगमगत्या विश्वात त्यांची ओळख ‘मास्टर जी’ म्हणून आहे.
सरोज खान यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, किशनचंद संधू आणि नोनी सिंग यांच्या घरात नागपाल यांचा जन्म झाला होता. पण वयाच्या 13 व्या वर्षी इस्लाम धर्माचा स्वीकार करत त्यांचं स्वतःचं नाव सरोज खान असं ठेवलं. एवढंच नाही तर, अवघ्या 13 व्या वर्षी त्यांनी 43 वर्षीय नृत्य गुरू सोहनलाल यांच्यासोबत लग्न केलं. पण आपल्यासोबत फसवणूक होत आहे याची सरोज खान यांना कल्पना नव्हती.
सरोज खान यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी नृत्य गुरू सोहनलाल विवाहित होते आणि त्यांना चार मुलं देखील होती. सत्य कळल्यानंतर सरोज खान यांना मोठा धक्का बसला. एवढंच नाही तर, पतीने सरोज खान यांच्या मुलांना स्वतःचं नाव देण्यास देखील नकार दिला.
पतीने साथ सोडल्यानंतर खचलेल्या सरोज खान यांच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाली. रोशन खान यांनी सरोज यांना लग्नाची मागणी घातली. पण सरोज खान यांनी रोशन खान यांच्या पुढे एक अट ठेवली… मुलांना स्वतःचं नाव द्यावं… असं अट रोशन खान यांच्यापुढे होती. सरोज यांनी अट रोशन खान यांनी मान्य केली.
‘दम मारो दम’ गाण्याच्या शुटिंग पूर्वी सरोज खान यांच्या दुःखाचा डोंगर कोसळला. सरोज खान यांच्या मुलीची प्रकृती गंभीर होती. पण सरोज खान यांना वेळेत काम देखील पूर्ण करायचं होतं. मुलीची प्रकृती गंभीर असल्यांमुळे सरोज खान यांनी 8 महिन्यांच्या मुलीला गमावलं.. 8 महिन्यांच्या मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर सरोज खान थेट कामासाठी सेटवर पोहोचल्या.
मुलीच्या निधनानंतर सरोज खान ‘हरे राम हरे कृष्णा’ सिनेमातील ‘दम मरो दम’ गाणं कोरियोग्राफ करण्यासाठी निघाल्या. रिपोर्टनुसार सरोज खान यांनी 350 सिनेमांपैकी तीन हजारपेक्षा अधिक गाणी कोरियोग्राफ केली आहेत.