Chandigarh MMS leak case: ‘वेळ आली आहे की आपण…’,चंदीगड MMS लीक प्रकरणावर सोनू सूदची प्रतिक्रिया

| Updated on: Sep 18, 2022 | 5:29 PM

चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ लीक होऊन व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थिनींनी काल रात्री निदर्शने केली होती.

Chandigarh MMS leak case: वेळ आली आहे की आपण...,चंदीगड  MMS लीक प्रकरणावर सोनू सूदची प्रतिक्रिया
Sonu sood
Image Credit source: Instagram
Follow us on

पंजाबमधील चंदिगड विद्यापीठात(Chandigarh University) शिकणाऱ्या विद्यार्थिनींचे एमएमएस लीक प्रकरण (MMS leak case)सध्या देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. या घटनेचा उलगड झाल्यापासून आठ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे मीडियारिपोर्ट (Media Report)समोर आल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे चंदीगड विद्यापीठ एमएमएस प्रकरणाच्या नावाने अनेक बनावट व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. या यासगळ्या प्रकरणावर अभिनेता सोनू सूदनेही प्रतिक्रिया दिली आहे. या . ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यास सांगितले आहे.

जे घडले ते अत्यंत दुर्दैवी

चंदीगडमधील घटनेबाबत सोनू सूदने ट्विट लिहिले, की – ‘चंदीगड विद्यापीठात जे घडले ते अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्या भगिनींच्या पाठीशी उभे राहून जबाबदार समाजाचा आदर्श ठेवण्याची वेळ आली आहे. ही वेळ आपल्या सर्वांसाठी आहे, पीडितांसाठी नाही. जबाबदार राहा’. चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ लीक होऊन व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थिनींनी काल रात्री निदर्शने केली होती.

हे सुद्धा वाचा

चौकशीचे दिले आदेश

पंजाब सरकारनेही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी ही कॅम्पसच्या हॉस्टेलमध्ये राहणारी विद्यार्थीनी असल्याचेही बोलले जात आहे. आरोपी विद्यार्थिनीने हा व्हिडिओ शूट केला आणि नंतर तो व्हायरल केला. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपी विद्यार्थिनीला अटकही करण्यात आली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात चंदीगड विद्यापीठाचे वक्तव्य समोर आले आहे. ज्यामध्ये इतर विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केल्याची चर्चा पूर्णपणे खोटी आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही विद्यार्थिनींचा कोणताही व्हिडिओ आक्षेपार्ह आढळला नाही. या घटनेत एकाही मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही.असे विद्यापीठाने म्हटले आहे.