मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन आणि टीव्ही अभिनेत्री चारु असोपा (Charu Asopa) यांनी काही दिवसांपूर्वीच एकमेकांवर अत्यंत गंभीर आरोप केले. सर्वात अगोदर चारु असोपा हिने राजीव सेन याचे अनैतिक संबंध बाहेर असून तो आपल्याला धोका देत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राजीव सेन (Rajeev Sen) यानेही चारू असोपा हिचे एका टीव्ही अभिनेत्यासोबत अफेअर सुरू असल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू होत्या. राजीव सेन आणि चारु असोपा यांचा घटस्फोट लवकरच होणार असे सतत सांगितले जात होते. शेवटी आता यांचा घटस्फोट (Divorced) झालाय. चारु असोपा आणि राजीव सेन हे आता विभक्त झाले आहेत.
चारु असोपा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. इतकेच नाही तर ब्लाॅगच्या माध्यमातूनही चारु असोपा ही चाहत्यांच्या संपर्कात असते. राजीव सेन याच्यासोबत सतत वाद होत असल्याने चारु असोपा ही वेगळी राहत होती. आता 8 जून 2023 रोजी यांचा घटस्फोट झालाय.
चारु असोपा हिने मुंबईमध्ये एक फ्लॅट घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच चारु असोपा हिने तिचे संपूर्ण घर हे चाहत्यांना दाखवले आहे. चारु असोपा ही तिच्या मुलीसोबत राहते. चारू असोपा आणि राजीव सेन यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया यावर्षी जानेवारीपासून सुरू होती. समुपदेशन सत्रानंतर न्यायालयाने यांना सहा महिन्यांचा कुलिंग ऑफ कालावधी दिला होता.
2019 मध्ये गोव्या येथे या दोघांनी अत्यंत राॅयल पध्दतीने लग्न केले. 2021 मध्ये यांनी त्यांच्या मुलगी स्वागत केले. घटस्फोटानंतर चारू असोपा हिच्याकडे मुलगी राहणार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वीही यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. मात्र, त्यानंतर यांच्यामध्ये सर्वकाही ठिक झाले. मात्र, यांचा आता घटस्फोट झाल्याचे कळताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
चारू असोपा हिचा काही दिवसांपूर्वी वाढदिवस झाला. या वाढदिवसाच्या पार्टीला राजीव सेन याने हजेरी लावली. इतकेच नाही तर वाढदिवसाच्या पार्टीमध्ये धमाका करताना राजीव सेन आणि चारू असोपा हे दिसले होते. यामुळे यांचा घटस्फोट होणार नसल्याचा अंदाजा चाहत्यांना लावला होता. मात्र, आज राजीव सेन आणि चारू असोपा हे विभक्त झाले आहेत.