मुंबई : दिवाळीच्या दिवशी सलमान खान याचा टायगर 3 हा चित्रपट धमाका करताना दिसतोय. विशेष म्हणजे चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय. सलमान खान याच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही नक्कीच आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ या चित्रपटात धमाका करत आहेत. आता टायगर 3 चित्रपटाबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया या सोशल मीडियाला येताना दिसत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सलमान खान याच्या टायगर 3 चित्रपटाचे काैतुक केल्याचे बघायला मिळतंय. चित्रपट नक्कीच जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय.
एकंदरीतच काय तर सलमान खान याच्या चित्रपटाला चांगला रिव्ह्यू मिळताना दिसतोय. एकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, टायगर 3 मध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा भूमिका जबरदस्त आहेत, विशेष म्हणजे त्यांनी धमाकेदार असे अॅक्शन देखील केले. #Tiger3Review- माझी 5/5….असे त्या व्यक्तीने लिहिले.
#Tiger3 is the best action movie of all time with incredible performances and action by Salman Khan and especially Katrina Kaif. #Tiger3Review My rating 5/5. ⭐️⭐️⭐️⭐️⭐️ #SalmanKhan #KatrinaKaif pic.twitter.com/WJ585MYd9A
— Aijaz 🇺🇸 (@TheAijazHussain) November 11, 2023
दुसऱ्याने पोस्ट शेअर करत लिहिले की, चित्रपटामध्ये अॅक्शनसोबतच मला चित्रपटाची स्टोरी देखील आवडलीये. सर्वच कलाकार उत्तर प्रकारे आपल्या भूमिका या साकारत आहेत. चित्रपट पाहताना कधी टाळ्या वाजवू आणि शिट्या हेच मुळात कळत नाहीये. नक्कीच सलमान खान याचा हा चित्रपट ओपनिंगलाच करोडोंचा बिझनेस करेल.
Now Time for #Tiger3Review ⭐️⭐️⭐️⭐️ 1/2
This is the best action movie of the entire Bollywood along with the SPY UNIVERSE
Along with explosive 🧨 Action, such a awesome story which will touch your heart❤️
You won’t realize when you will be forced to whistle and clap while… pic.twitter.com/7ot9BtOEAo
— Wasim Ahmad (@wasimopedia) November 11, 2023
तिसऱ्याने लिहिले की, धन्यवाद मनीष शर्मा सलमान खान याला या रूपामध्ये बघू देण्यासाठी. सर्वजग त्याला अशाप्रकारे पाहण्यास इच्छुक होते. इमरान हाश्मी बाप रे बाप, त्याने निगेटिव्ह भूमिका साकारली आहे, खरोखरच खूपच जास्त जबरदस्त. अजून एकाने लिहिले की, खरोखरच टायगर 3 मधील स्वॅग जबरदस्त आहे.
Tiger 3 Movie Review : Great Action With Different Swag In Tiger 3, Salman’s Great Gift To Fans On Diwali #SalmanaKhan #Tiger3 #Tiger3Review https://t.co/MSI0K0J1J9
— Sarkarihelpline.com (@SarkariHelpline) November 12, 2023
सलमान खान आणि चित्रपटाच्या टिमकडून आम्हाला दिवाळीचे खरोखरच खूप मोठे गिफ्ट मिळाले आहेत. एकीकडे चित्रपटाचे काैतुक केले जात आहे तर दुसरीकडे चित्रपटाला नकारात्मक रिव्ह्यू देखील मिळताना दिसत आहे. एकाने लिहिले की, मला सलमान खान हा या चित्रपटामध्ये खूपच जास्त सुस्त दिसत आहे.
#Tiger3Review : Disappointing #SalmanKhan seems lethargic and trying too hard. The aura is missing and the screen presence looks animated#SRK lifts the movie on his entry but the movie drags again after his cameo. Katrina Kaif plays her part#Tiger3 will wrap under 250 cr. pic.twitter.com/Q4gEUr7nI3
— Pratham (@JainnSaab) November 11, 2023
अजून एकाने नकारात्मक रिव्ह्यू देत लिहिले की, मला हा चित्रपट अजिबातच आवडला नाहीये. खूप झाले तर हा चित्रपट 250 कोटींपर्यंत कमाई करू शकतो. अनेकांनी कतरिना कैफ हिची भूमिका आवडली नसल्याचे देखील दिसत आहेत. आता सर्वांच्या नजरा या चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनकडे लागल्याचे स्पष्ट दिसतंय.