मुंबई : बॉलिवुडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेता इमरान हाश्मी (Emraan hashmi) यांच्या आगामी ‘चेहरे’ (Chehre) या चित्रपटाची चाहत्यांना आतुरतेने प्रतिक्षा आहे. हा चित्रपट बर्याच दिवसांपासून चर्चेचा भाग बनला आहे. ‘चेहरे’च्या टीझर्स आणि पोस्टर्समधून अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) गायब झाल्यानंतर तिला या चित्रपटातून काढून टाकल्याची शक्यता वर्तवली जात होती. पण, आता ट्रेलरमध्ये निर्मात्यांनी अखेर रियाची झलक चाहत्यांना दाखवली आहे. रुमी जाफरी दिग्दर्शित ‘चेहरे’चा ट्रेलर आज (18 मार्च) प्रदर्शित झाला आहे (Chehre Trailer Out Actress Rhea Chakraborty seen for only 2 seconds).
इमरान हाश्मीने ‘चेहरे’चा ट्रेलर शेअर करताना लिहिले की, ‘दोष सिद्ध होईपर्यंत प्रत्येकजण संशयास्पद आहे. आपण खेळाचा सामना करण्यास तयार आहात? 9 एप्रिल रोजी थिएटरमध्ये पाहा ‘चेहरे’.’
केवळ 2 मिनिट 22 सेकंदाचा हा ट्रेलर अमिताभ बच्चन यांच्या आवाजाने सुरू होईल. अमिताभ बच्चन म्हणतात, ‘अगर आप में से किसी ने कोई अपराध या जुर्म किया है तो बहुत संभलकर यहां से गुजरिएगा. क्योंकि ये खेल आपके साथ भी खेला जा सकता है..’ त्यानंतर इम्रान हाश्मी डोंगरात अडकतो आणि अमिताभ बच्चन यांच्या घरी थांबतो आणि तिथेच त्याच्याबरोबर गुन्हा आणि शिक्षेचा खेळ सुरू होतो. या गेममध्ये इमरान हाश्मी स्वत:च रचलेल्या सापळ्यात अडकतो. ट्रेलरमध्ये अमिताभ बच्चन यांचे धमाकेदार संवाद ऐकायला आहेत. तसेच, क्रिस्टल डिसुझा देखील यात दिसली आहे. अखेर या ट्रेलरमध्ये केवळ 2 सेकंद रिया चक्रवर्तीची झलक पाहायला मिळाली.
इमरान हाश्मी आणि बिग बी अभिनित हा चित्रपट 30 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, त्यानंतर त्याची रिलीजची तारीख 9 एप्रिल करण्यात आली. टीझरच्या रिलीजबरोबर चित्रपटाच्या रिलीजची तारीखही बदलली गेली (Chehre Trailer Out Actress Rhea Chakraborty seen for only 2 seconds).
‘चेहरे’ हा एक गूढ-थ्रिलर चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन रूमी जाफरी यांनी केले आहे. या वर्षाचा सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपट म्हणून ‘चेहरे’चे नाव घेतले जात आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी व्यतिरिक्त अन्नू कपूर, क्रिस्टल डिसूझा, धृतिमान चक्रवर्ती, रघुबीर यादव आणि सिद्धांत कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित याच्या मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड केली आहे. हा चित्रपट आता 9 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
कोरोना साथीच्या रोगामुळे मागील वर्षी ‘चेहरे’ प्रदर्शित होऊ शकला नाही. चित्रपटाची घोषणा 11 एप्रिल 2019 रोजी झाली होती आणि त्याचे शूटिंग 10 मे रोजी सुरू झाले. गेल्या वर्षी 17 जुलै रोजी हा चित्रपट रिलीज होणार होता, पण कोरोनामुळे रिलीजला ब्रेक लागला.
जेव्हा चित्रपटाच्या पोस्टर्सवर रियाला जागा दिली जात नव्हती तेव्हा बर्याच चित्रपट निर्मात्यांनी रियाचे समर्थन केले. एका चित्रपट निर्मात्याने म्हटले होते की, ‘मला नक्कीच रियाबरोबर काम करायचं आहे. ती सुंदर आणि प्रतिभावान आहे आणि आता लोकांनाही तिला मोठ्या पडद्यावर बघायचे आहे. मला तिच्याबरोबर काम करण्यात काहीच अडचण नाही.’
(Chehre Trailer Out Actress Rhea Chakraborty seen for only 2 seconds)
SSR Drug Case | रिया चक्रवर्तीला कोर्टाचा दिलासा, जामिनाविरोधातील याचिकेवरील पुन्हा सुनावणी होणार!
Jhimma : चला खेळूया ‘झिम्मा’ म्हणत क्षिती जोग झळकणार नव्या भूमिकेत