‘छावा’ सिनेमामुळेच नागपूरमध्ये राडा, ‘ही’ व्यक्ती जबाबदार, स्वरा भास्कर म्हणाली, ‘मुर्ख…’

| Updated on: Mar 26, 2025 | 8:45 AM

'छावा' सिनेमामुळे नागपूरमध्ये भडकली हिंसा, हिंसेसाठी 'ही' व्यक्ती जबाबदार, स्वरा भास्करच्या दोन पोस्ट व्हायरल, अभिनेत्री कोणाला म्हणाली 'मुर्ख' आणि कोणावर साधला निशाणा? सध्या सर्वत्र स्वराच्या ट्विटची चर्चा

छावा सिनेमामुळेच नागपूरमध्ये राडा, ही व्यक्ती जबाबदार, स्वरा भास्कर म्हणाली, मुर्ख...
Follow us on

अभिनेत्री स्वरा भास्कर कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता देखील स्वरा भास्कर हिचे दोन ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नागपूर येथील राड्यासाठी अभिनेता विकी कौशल आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर जबाबदार असल्याचे आरोप लावण्यात आले आहे. तर दुसरीकडे अभिनेत्रीने कुणाल कामरा याची बाजू घेत कॉमेडियनचं कौतुक केलं आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे. पण या ट्विटचं सत्य कळल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसले.

सोशल मीडियावर स्वरा भास्कर हिच्या दोन पोस्ट व्हायरल होत आहेत. एका ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘छावा सिनेमा प्रक्षोभक होता. नागपूर येथील झालेल्या राड्यासाठी विकी कौशल आणि निर्माते जबाबदार आहेत. सिनेमावर बंदी घातली पाहिजे…’

हे सुद्धा वाचा

 

 

तर दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘कामरा याचा शो एक कॉमेडी शो आहे. झालेल्या तोडफोडीसाठी शिंदे कार्यकर्ते जबाबदार आहे…’ सध्या सर्वत्र ट्विटची चर्चा रंगली आहे. पण स्वरा भस्करच्या ट्विटचं सत्य जाणून तुम्हाला देखील धक्का बसले.

 

 

स्वरा भास्करच्या नावाने सध्या ट्विट व्हायरल होत आहे. ज्यामुळे अभिनेत्रीला टीकेचा सामना करावा लाहत आहे. पण अभिनेत्री म्हणाली हे ट्विट मी केलेलं नाही ते फेक आहे. उजव्या विचारसणीच्या लोकांनी फेक ट्विट व्हायरल केले आहेत. तुम्ही फॅक्ट तपासून पाहा. असं अभिनेत्री म्हणाली. ‘

ट्विटचे स्क्रिनशॉट शेअर करत स्वरा भास्कर म्हणाली, ‘मुर्ख उजव्या विचारसणीच्या लोकांनी तेच काम करणं सुरु केलं आहे. ज्यामध्ये ते उत्तम आहेत. फोक फोटो आणि मीम्स व्हायरल करणं…’ सध्या सर्वत्र स्वरा भास्करच्या ट्विटची चर्चा सुरु आहे.

स्वरा भास्कर हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘मिसेज फलानी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. पण अद्याप सिनेमाच्या प्रदर्शनाची तरीख समोर आलेली नाही.