निक्कीसोबत छोटा पुढारीच्या मैत्रीबद्दल आईची प्रतिक्रिया; मागी मागत म्हणाल्या..

| Updated on: Aug 18, 2024 | 11:56 AM

बिग बॉस मराठीच्या घरात छोटा पुढारीची निक्की तांबोळीसोबत चांगलीच मैत्री झाली आहे. या दोघांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर आता छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरवडेच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.

निक्कीसोबत छोटा पुढारीच्या मैत्रीबद्दल आईची प्रतिक्रिया; मागी मागत म्हणाल्या..
Nikki Tamboli and Chhota Pudhari
Image Credit source: Instagram
Follow us on

‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन तुफान गाजतोय. याचा पुरावा म्हणजे या शोला मिळणारा टीआरपी. रितेश देशमुख या नव्या सिझनचं सूत्रसंचालन करत असून त्याच्या ‘भाऊचा धक्का’ या विशेष एपिसोड्सला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. बिग बॉसच्या घरात राहून आता स्पर्धकांना वीस दिवस उलटले आहेत. एकेक स्पर्धकाचे नवनवीन रंग प्रेक्षकांना पहायला मिळतायत. तर बिग बॉसच्या घरात काहींची मैत्री फुलतेय. सध्या निक्की तांबोळी आणि घनश्याम दरवडे यांच्यातील मैत्रीने प्रेक्षकांचं लक्ष वेधलंय. या दोघांच्या मैत्रीचे व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर आता घनश्यामच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत घनश्यामच्या वडिलांनी सांगितलं की त्याने बिग बॉसच्या घरात जाण्याआधी कोणतीच अशी विशेष तयारी केली नव्हती. तर निक्कीसोबतच्या त्याच्या मैत्रीविषयी आई अलका दरवडे म्हणाल्या, “दिसतं तसं नसतं आणि म्हणून तर जग फसतं. निक्की आणि घनश्याम यांच्याच बहीणज-भावंडांचं प्रेम आहे. लोकांना त्यात उगाचच इश्यू वाटतोय.”

हे सुद्धा वाचा

बिग बॉसच्या घरातील त्याच्या खेळीविषयी आणि चिडण्याविषयी आई पुढे म्हणाली, “आम्ही शेतकरी कुटुंबातील आहोत. रानात काम करताना चार बायांची टोळी इकडे तर चार बायांची टोळी तिकडे व्हायची. त्यामुळे टीममध्ये कसं काम करायचं हे त्याने घरातूनच शिकलंय. तो लहान आहे. त्याला वाटतंय की ही मंडळी आपल्या बाजूने आहेत, म्हणून तो दुसऱ्या बाजूच्या लोकांवर चिडतोय. यामुळे दुसऱ्या बाजूच्या लोकांना वाटतोय की तो चिडकाच आहे. पण एक आई म्हणून मी आत्मविश्वासाने सांगते की तो जितका चिडका आणि कडक दिसतो, तितका तो नारळाच्या पाण्यासारखा गोड आहे. बिग बॉसच्या घरात दोन गट पडल्याने तो असा वागतोय. पण तो अजून लहान आहे.”

“बिग बॉसच्या घरात तो काही लोकांवर चिडतोय. पण त्याच्या वतीने मी माफी मागते. त्याला समजून घ्या. त्याला तुमच्याबरोबर खेळू द्या. घनश्यामला गावापासून ते राज्यापर्यंत अनेक लोकांचा पाठिंबा आहे. त्याच्यावर लोकांचा आशीर्वाद असाच राहू द्या”, अशा शब्दांत त्या व्यक्त झाल्या आहेत.