नवी दिल्ली : तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी(Chiranjeevi) यांनी बुधवारी साई धरम तेज(Sai Dharam Tej)च्या रिपब्लिक(Republic)चा ट्रेलर रिलीज केला. साई धरम तेज हे चिरंजीवी यांचे पुतणे आहेत. या दोन्ही स्टार्सना साउथ इंडस्ट्रीमध्ये खूप मागणी आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करताना, चिरंजीवी यांनी साई धरम तेजच्या प्रकृतीचाही उल्लेख केला आहे आणि सांगितले की आता ते हळूहळू रुग्णालयात बरे होत आहेत. अभिनेत्याने चाहत्यांना सांगितले की तो त्यांच्यासाठी त्याच प्रकारे प्रार्थना करत आहे. (Chiranjeevi releases trailer of Sai Dharam Tej’s ‘Republic’)
या चित्रपटाचा ट्रेलर अतिशय शानदार आहे, ज्यामध्ये एका राज्यात होणाऱ्या दंगली आणि त्यामागची कारस्थाने दाखवण्यात आली आहेत. तेज या चित्रपटात एका जिल्हाधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. जिथे ते अशा दंगली थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. या चित्रपटात पूर्णपणे राजकीय तडका दाखवला आहे. ज्यामध्ये दाखवले गेले आहे की, का लोकशाहीत समतोल राखणे आवश्यक आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सामान्य माणसाचे जीवन आणि त्याचे त्रास जवळून पाहण्याची संधी मिळताना दिसत आहे.
साई धरम तेजचा 10 सप्टेंबर रोजी अपघात झाला, त्यानंतर त्याला हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बातमी आल्यानंतर सई तेजच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. या अपघाताच्या घटनेत त्याच्या शरीराचे अनेक भागात जखमा झाल्या आहेत, सुरुवातीला अभिनेत्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. पण आता त्याची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे, जिथे तो सध्या हॉस्पिटलमध्ये बेड रेस्टवर आहे.
चिरंजीवींनी या खास ट्विटमध्ये सांगितले आहे की, हा चित्रपट फक्त 1 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल, जिथे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. देवकट्टा हा या चित्रपटाचा लेखक आणि दिग्दर्शक आहे. या चित्रपटाचे निर्माते जे भगवान आणि जे पुल्ला राव आहेत. या चित्रपटात साई धरम तेज व्यतिरिक्त ऐश्वर्या राजेश, जगपति बाबूंसह अनेक मोठे स्टार्स आपल्याला पाहायला मिळतील.
आजकाल चिरंजीवी त्याच्या पुढच्या ‘गॉडफादर’ चित्रपटाबाबत चर्चेत आहेत. जिथे सध्या या चित्रपटाचे शुटिंग ऊटीमध्ये सुरू आहे. जिथे आधी या चित्रपटाचे शुटिंग हैदराबादमध्ये चालू होते. ‘गॉडफादर’ हा चित्रपट चिरंजीवींचा 153 वा चित्रपट असणार आहे. ज्यासाठी अभिनेता खूप आनंदी आहे. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी कधी रिलीज होतो हे पाहावे लागेल. (Chiranjeevi releases trailer of Sai Dharam Tej’s ‘Republic’)
इतर बातम्या
भाजीपाल्याचे उत्पादन 60 दिवसांच्या आत पदरात, भरघोस कमाईही
पुण्यात तुफान पाऊस, प्रसिद्ध कार्ला लेणी बंद ठेवण्याचे पुरातत्व विभागाचे आदेश