Chitra Wagh On Urfi Jawed : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मॉडेल उर्फी जावेद हिच्या कपड्यांवर पुन्हा पत्रकार परिषदेत विरोध केला. महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही, माझी ही ठाम भूमिका आहे असं चित्रा वाघ म्हणाल्या. ‘मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, तुमच्यात जितका दम आहे तितकं तुम्ही करा. उर्फी जावेदच्या कपड्यांना माझा विरोध कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार. त्यामुळे हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. ही माझी ठाम भूमिका आहे. तुम्हाला काय करायचं ते करा.’ असं चित्रा वाघ म्हणाल्या
‘माझ्यासोबत गावा-गावातील जनता आहे. मी अनेक जिल्ह्यांमध्ये जाते, ते मला थांबवून सांगतात चित्रा ताई तुम्ही चांगला मुद्दा घेतला. ज्या लोकांसाठी हा मुद्दा घेतला आहे, त्यांच्यासाठी तो मु्द्दा महत्त्वाचा आहे. मी भाजपची कार्यकर्ता नंतर आहे, पण त्याआधी मी एक आई आहे. आम्हाला देखील मुलं बाळं आहेत. आम्ही आमच्या मुलांसमोर काय द्यायचं. काय आदर्श ठेवायचे. असं म्हणत चित्रा वाघ यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केला.
पुढे चित्रा वाघ म्हणाल्या, ‘तिने याठिकाणी काही पानचट म्हणावं आणि आमच्या मुलांचे फोटो व्हायरल करायचे. आमच्यावर टीका करून पोट भरलं नाही, तर तुम्ही आमच्या कुटुंबावर आलात. आमचा मुलांचा राजकारणासोबत काडीचा देखील संबंध नसताना त्यांचे फोटो व्हायरल करायचं तुम्ही काम केलं काय म्हणावं तुम्हाला..’ असं म्हणत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला.
‘तुमच्या कुटुंबातील लोकांना विचारा हा नंगानाच त्यांना चालणार आहे का? आम्ही का भांडत आहोत… आम्ही समाजासाठी भांडत आहोत. आज जर हा आवज थांबला तर हा नंगानाच संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल आणि आमची ही संस्कृती नाही, फॅशनच्या नावाखाली हे सगळं चालू देणार नाही. तुम्ही काय करायचं ते करा तुमचं प्रोफेशन आहे, त्या पद्धतीने पेहराव करा पण तुम्ही फक्त प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी चिंध्या लावून फिरताय भर रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी हे मान्य आहे तुम्हाला? ‘ असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.
‘ती इतकी निर्लज्ज बाई आहे समोर येवून सांगते माझा हा भाग दिसला तो भाग दिसला.. तरच त्याच्यावर कारवाई होणार… अशी कोणती बाई म्हणते. त्यानंतर माझ्यावर प्रेम करणाऱ्या मैत्रिणी म्हणतात ती त्या धर्माची आहे म्हणून चित्रा वाघ विरोध करत आहेत. कोणता धर्म सांगतो असं उघडं-नागडं फिरा असं सांगतं… ज्या धर्माची उर्फी आहे, ते हिजाबवरुन भांडणं करत आहेत आणि इंथे धर्माचा विषयच नाही. याठिकाणी विषय विकृती आहे असं म्हणत चित्रा वाघ यांनी उर्फीवर निशाणा साधला.