अभिनेत्रीचे तुरुंगातील ‘ते’ २६ दिवस; टॉयलेटमधील पाण्यापासून बनवली कॉफी, सर्फने धुवावे लागले केस…

| Updated on: Apr 27, 2023 | 5:33 PM

'या' कारणामुळे अभिनेत्री परदेशातील तुरुंगात होती कैद... तुरुंगात घालवलेल्या २६ दिवसांबद्दल अभिनेत्रीने सोडलं मौन... सध्या सर्वत्र बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची चर्चा...

अभिनेत्रीचे तुरुंगातील ते २६ दिवस; टॉयलेटमधील पाण्यापासून बनवली कॉफी, सर्फने धुवावे लागले केस...
Follow us on

मुंबई : ‘सडक २’ आणि ‘बाटला हाउस’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री क्रिसन परेरा (Chrisann Pereira) हिला दुबई येथील शाहजहा तुरुंगात कैद करण्यात आलं होतं. अंमली पदार्थांच्या तस्करीत अभिनेत्रीचं नाव आल्यामुळे तिला अटक करण्यात आली. अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात मला आडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला… असं क्रिसन परेरा म्हणाली. आता अभिनेत्रीची अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणातून सुटका झाली आहे. पण परदेशात बॉलिवूड अभिनेत्री तब्बल २६ दिवस कैद होती. सध्या अभिनेत्रीने लिहिलेलं एक पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पत्र अभिनेत्रीने तुरुंगात घालवलेल्या २६ दिवसांबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्रीसाठी तुरुंगातील २६ दिवस फार भयानक होते.

पत्रामध्ये अभिनेत्री क्रिसन परेरा हिने काय लिहिलं आहे?

पत्रात अभिनेत्री म्हणते, ‘तुरुंगात पेन आणि पेपर मिळवण्यासाठी मला ३ आठवडे आणि ५ दिवस लागले. तुरुंगात मला सर्फने केस धुवावे लागले आणि मी टॉयलेटमधील पाण्यापासून कॉफी बनवली. मी बॉलिवूड सिनेमे पाहिले… अनेकदा माझ्या डोळ्यांमध्ये पाणी आलं… मी अनेकदा आपलं कल्चर, सिनेमे आणि टीव्हीवरील कुटुंबपाहून हसली… भारतीय असल्याचा मला गर्व आहे… मी भारतील सिनेश्वातील एक भाग आहे…’

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘तुम्ही खरे योद्धा आहात, मी ‘मेनस्टार्स’द्वारे रचलेल्या या वाईट खेळात मी अडकली… ज्यांनी माझ्यासाटी ट्विट केलं, माझी कथा शेअर केली… त्यांची मी आभारी आहे. अंतरराष्ट्रीय अपराधाला दुजोरा देणाऱ्या गुन्हेगारांना अटक करण्यासाठी ट्विट केलं… आता घरी पोहोचण्यासाठी मी आणखी प्रतीक्षा करु शकत नाही..’ असं देखील अभिनेत्रीने पत्रात लिहिलं आहे…

एका न्यूज पोर्टलला दिलेल्या माहितीनुसार, शारजाह विमानतळावर पोहोचल्यानंतर त्याठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी क्रिसन हिला ताब्यात घेतलं. अभिनोत्रीला ताब्यात घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी तिच्या कुटुंबासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु केला. भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीला अटक केल्यानंतर ७२ तासांनी अभिनेत्रीच्या कुटुंबियांनी तिच्याबद्दल माहिती देण्यात आली. आता तब्बल २६ दिवसांनी अभिनेत्रीची सुटका झाली आहे.

क्रिसन दुबईमध्ये एका ऑडिशनसाठी आली होती. दुबईत पोहोचल्यानंतर विमानतळावर जेव्हा अभिनेत्रीला पडकण्यात आलं. तिच्याकडे असलेल्या ट्रॉफीमधून अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थ ताब्यात घेतले. असं अभिनेत्रीच्या कुटुंबियांनी सांगितलं. १० एप्रिल रोजी पोलिसांनी अभिनेत्रीवर ड्रग्ज तस्करीचे आरोप केले.