CID फेम अभिनेत्रीकडून कुटुंबीयांवर मारहाणीचा गंभीर आरोप; व्हिडीओत दाखवले जखमांचे व्रण

| Updated on: Dec 16, 2023 | 8:56 AM

सीआयडी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वैष्णवी धनराजचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तिने तिच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. कुटुंबीयांनी मारहाण केल्याचं सांगत तिने मदतीची विनंती केली आहे.

CID फेम अभिनेत्रीकडून कुटुंबीयांवर मारहाणीचा गंभीर आरोप; व्हिडीओत दाखवले जखमांचे व्रण
अभिनेत्री वैष्णवी धनराज
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : 16 डिसेंबर 2023 | ‘सीआयडी’ या टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारलेली अभिनेत्री वैष्णवी धनराजचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ती नेटकऱ्यांकडून मदतीची मागणी करतेय. व्हिडीओत तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर बऱ्याच जखमाही पहायला मिळत आहेत. वैष्णवीने तिच्या कुटुंबीयांवर मारहाणीचा गंभीर आरोप केला आहे. या व्हिडीओत ती रडत-रडत घटनेबद्दल बोलताना दिसत आहे. वैष्णवीने ‘सीआयडी’सह ‘तेरे इश्क मे घायल’ आणि ‘बेपनाह’ यांसारख्या मालिकांमध्येही काम केलंय. तिचा हा व्हिडीओ हिमांशु शुक्ला नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘सीआयडी’ फेम अभिनेत्री मदतीची विनंती करतेय, असं त्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे.

वैष्णवी सध्या काशिमीरा पोलीस ठाण्यात आहे. तिच्या कुटुंबीयांनी तिचा फोनसुद्धा स्वत:कडे ठेवला आहे, असंही त्यात लिहिण्यात आलं आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये वैष्णवी स्वत: सर्वकाही सांगताना दिसतेय. तिने नेटकऱ्यांना तिच्या चेहऱ्यावरील, ओठांवरील आणि हातांवरील जखमेच्या खुणाही दाखवल्या आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावर मुंबई पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी वैष्णवीला तिचा संपर्क क्रमांक मागितला आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

वैष्णवीने 2016 मध्ये नितीन शेरावतशी लग्न केलं होतं. मात्र आता दोघंही वेगवेगळे राहतात. ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत तिने पतीवर गंभीर आरोप करत सांगितलं होतं की, “मला माझ्या पतीची खूप भीती वाटते. तो मला मारून टाकेल. म्हणूनच मी घरातून पळाले. त्याने मला इतक्या जोरात मारलं होतं की माझ्या पायातून रक्त येत होतं.”

वैष्णवीने 2008 मध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ती ‘कसौटी जिंदगी में’ या शोमध्ये दिसली होती. तिने 2012 मध्ये मॉडेल नितीनशी लग्न केलं. मात्र या दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. 2016 मध्ये तिने घटस्फोट घेतला.