CID फेम अभिनेता मृत्यूच्या दारात, फ्रेडरिक्स याच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

| Updated on: Dec 03, 2023 | 8:07 AM

CID : सीआयडी (CID) फेम अभिनेता लढतोय जीवन-मरणाची लढाई; फ्रेडरिक्सच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर... फ्रेडरिक्स याच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळताच चाहत्यांनी व्यक्त केली चिंता... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या प्रकृतीच्या चर्चा...

CID फेम अभिनेता मृत्यूच्या दारात, फ्रेडरिक्स याच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर
Follow us on

मुंबई | 3 मुंबई 2023 : सीआयडी (CID) मध्ये फ्रेडरिक्स ही भूमिका साकारणार अभिनेता दिनेश फडनीस याच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त फ्रेडरिक्स याची चर्चा रंगली आहे. सीआयडीमध्ये आपल्या विनोदबुद्धीने सर्वांना हसवणार अभिनेता आता जीवन-मरणाची लढाई लढत आहे. दिनेश फडनीस याला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईच्या तुंगा रुग्णालयात अभिनेत्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दिनेश फडणीस सध्या व्हेंटिलेटरवर असून जीवन-मरणाशी झुंज देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, शुक्रवारी 1 डिसेंबरच्या रात्री अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक होती. पण आता दिनेश याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळत आहे. दिनेश फडनीस म्हणजेच फ्रेडरिक्स याच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त फ्रेडरिक्स यांच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्याच्या प्रकृतीची माहिती मिळताच चाहत्यांसह सेलिब्रिटींना देखील धक्का बसला आहे. सीआयडी शोमधील स्टार कास्ट दिनेश याची विचरपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. अभिनेत्याच्या प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी चाहते, सेलिब्रिटी आणि कुटुंबिय प्रार्थना करत आहेत. वयाच्या 57 व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

दिनेश याने फक्त सीआयडीमध्येच नाही तर, इतर मालिका, सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेता आता रुपेरी पडद्यापासून दूर असला तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो.

सीआयडी शोमधील कलाकार

सीआयडीमध्ये दिनेश फडनीस याच्यासोबतच शिवाजी साटम, दयानंद शेट्टी, अश्विनी काळसेकर, आदित्य श्रीवास्तव, जानवी छेडा गोपालिया, आशुतोष गोवारिकर, हृषिकेश पांडे आणि श्रद्धा मुसळे यांनी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. सीआयडी या शोने अनेक वर्ष चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही शोमधील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

दिनेश याने सीआयडी शिवाय, अभिनेता आमिर खान स्टारर ‘सरफरोश’ आणि अभिनेता हृतिक रोशन स्टारर ‘सुपर 30’ सिनेमात देखील काम केलं. एवढंच नाही तर, दिनेश याने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत देखील एक छोटी भूमिका साकारली होती. सध्या अभिनेता त्याच्या प्रकृतीमुळे चर्चेत आला आहे.