मुंबई | 4 मुंबई 2023 : अभिनेता दिनेश फडनीस याने ‘सीआयडी’ (CID) शोमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आपल्या विनोदबुद्धीने सर्वांना पोट धरुन हासावणार दिनेश फडनीस म्हणजे चाहत्यांचा लाडका फ्रेड्रिक्स आता जीवन – मरणाची लढाई लढत आहे. अभिनेता गेल्या कित्येक दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहे. फ्रेड्रिक्स याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर, सीआयडी मधील स्टार कास्टने देखील रुग्णालयात जाऊन फ्रेड्रिक्स याची विचारपूस केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त फ्रेड्रिक्स याच्या प्रकृतीची चिंता व्यक्त होत आहे.
अभिनेत्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर फ्रेड्रिक्स याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली. पण अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला नसून ‘सीआयडी’ मधील दया याने फ्रेड्रिक्स याच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट दिली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त फ्रेड्रिक्स याला नक्की काय झालं आहे… याची चर्चा रंगली आहे.
फ्रेड्रिक्स याला हृदयविकाराचा झटका आला नसून अभिनेत्याचं यकृत निकामं (लिव्हर डॅमेज) झाल्याची माहिती दया याने दिली आहे. दया म्हणाला, ‘फ्रेड्रिक्स पूर्वीपासून एका आजारावर गोळ्या घेत होता. मात्र त्या औषधाच्या दुष्परिणामांमुळे त्याला या समस्येला सामोरं जावं लागलं.’ सध्या सर्वत्र अभिनेत्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुंबईच्या तुंगा रुग्णालयात अभिनेत्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अभिनेता सध्या व्हेंटिलेटरवर असून जीवन-मरणाशी झुंज देत असल्याचा दावा करण्यात आला. शुक्रवारी 1 डिसेंबरच्या रात्री अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक होती. पण आता दिनेश याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळत आहे. चाहते देखील अभिनेत्यासाठी प्रर्थना करत आहेत
फ्रेड्रिक्स याने फक्त सीआयडी शोमध्येच नाही तर, अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं. पण सीआयडी शोमुळे अभिनेत्याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाला. ‘सीआयडी’ शो आता ऑफएअर झाला आहे. पण फ्रेड्रिक्स याला कोणीही विसरु शकलेलं नाही. फ्रेड्रिक्स याचे अनेक व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
फ्रेड्रिक्स स्वतः सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर फ्रेड्रिक्स उर्फी दिनेश फडनीस याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. पण आता अभिनेता रुग्णालयात उपचार घेत आहे.