काॅमेडियन भारती सिंह ही नेहमीच चर्चेत असते. भारती सिंहची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. भारती सिंह ही सोशल मीडियार सक्रिय असून चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ कायमच शेअर करताना दिसते. भारती सिंह ही ब्लाॅगच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात काय सुरू आहे हे आपल्या चाहत्यांना कायमच सांगताना दिसते. आता भारती सिंह हिच्याबद्दल एक अत्यंत हैराण करणारी बातमी पुढे येताना दिसत आहे. हेच नाही तर लोक हैराण झाले आहेत. भारती सिंह हिच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
नुकताच भारती सिंह हिने एक हैराण करणारी माहिती शेअर केलीये. भारती सिंह ही रूग्णालयात दाखल असून तिच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार आहे. भारती सिंह हिच्या पोटात त्रास होतोय. हेच नाही तर भारतीला काहीही खाता येत नाहीये. आपल्या दोन वर्षाच्या बाळापासून दूर राहवे लागत असल्याने भारती सिंह अधिक त्रस्त झालीये.
भारती सिंह हिच्यावर सध्या मुंबईच्या कोकिलाबेन रूग्णालयात उपचार सुरू आहेत. लवकरच भारतीवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. भारती सिंहला गेल्या तीन दिवसांपासून प्रचंड त्रास होतोय. गाॅल ब्लेडरमध्ये स्टोनची समस्या भारती सिंहला झालीये. यामुळे भारती सिंहला त्रास होतोय आणि लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
सध्या डाॅक्टर भारती सिंहची काळजी घेत आहेत. भारती सिंह हिचा मुलगा गोला हा दोन वर्षाचा आहे. भारती सिंह आपल्या व्हिडीओमध्ये म्हणत आहे की, मी पहिल्यांदा दोन दिवस माझ्या मुलापासून दूर आहे. त्याच्या जन्मानंतर मी कधीच त्याच्यापासून इतके दिवस दूर नाहीये. गोला मम्मा मम्मा करत असल्याचे म्हणताना देखील भारती सिंह दिसत आहे.
आता भारती सिंहचा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांची चिंता वाढल्याचे बघायला मिळत आहे. चाहते हे भारती सिंहच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. भारती सिंह ही कपिल शर्मामधून लोकांचे मनोरंजन करताना दिसली. भारती सिंहसोबत रूग्णालयात तिचा पती हर्ष लिंबाचिया देखील आहे. भारती सिंह ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे.