अभिनेत्री कंगना रनौत हिच्या आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे राजकारणातील वातावरण तापलं आहे. काँग्रेसच्या महिला नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या फेसबूक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून कंगनाचा एका अश्लील फोटो पोस्ट करण्यात आला होता. यावर सुप्रिया श्रीनेत यांनी व्हिडीओ पोस्ट करत स्वतःची भूमिका मांडली आहे. सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या, ‘मी सर्व शक्तीनिशी विचारधारेची लढाई लढत आहे. पण मी कधी कोणत्या महिलेच्या विरोधात वैयक्तिक टिप्पणी करु शकत नाही. अशा प्रवृत्तीचा मी विरोध करते.’
‘जी लोकं मला ओळखतात त्यांना माहिती आहे की मी असं कधीही करणार नाही. दुसऱ्या अकाउंटवरून हे कृत्य करण्यात आलं आहे. असं करणाऱ्याच्या शोधात मी आहे. माझ्या नावाचा गैरवापर करून तयार करण्यात आलेल्या पॅरोडी अकाउंटची तक्रार एक्स (ट्विटर) कडे केली आहे.’ असं देखील सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या.
#WATCH | Congress leader Supriya Shrinate issues clarification on her post regarding the BJP candidate from Mandi Kangana Ranaut.
She says, “Many people have access to my Facebook and Instagram accounts. Someone from them made an extremely inappropriate post today. As soon as I… pic.twitter.com/z4RGxr4HrK
— ANI (@ANI) March 25, 2024
सांगायचं झालं तर, कंगना रनौत हिच्यावर केलेली आक्षेपार्ह पोस्ट सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर सुप्रिया श्रीनेत यांच्याकडून ती पोस्ट डिलिट देखील करण्यात आली. पण यावर अभिनेत्रीने सुप्रिया श्रीनेत यांना सडेतोड उत्तर दिलं. कंगना म्हणाली, ‘कलाकार म्हणून माझ्या 20 च्या करियरमध्ये मी अनेक महिलांच्या भूमिका साकरल्या आहेत. आपण आपल्या मुलींना पूर्वग्रहाच्या बंधनातून मुक्त केले पाहिजे. प्रत्येक स्त्री तिच्या सन्मानास पात्र आहे.’
पुढे कंगना म्हणाली, ‘क्वीन मध्ये एका साध्या मुलीपासून धाकड सिनेमात एक गुप्तहेर… मणिकर्णिका सिनेमात देवी पासून ‘चंद्रमुखी’ सिमेतील राक्षसापर्यंत… ‘रज्जो’ सिनेमात एका वेश्या पासून ते ‘थलायवी’ सिनेमात एक क्रांतिकारी नेता पर्यंत… मी प्रत्येक भूमिका साकारली आहे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांचा अशाप्रकारे अपमान करणं थांबवलं पाहिजे.’ असं सडेतोड उत्तर कंगनाने सुप्रिया श्रीनेत यांना दिलं.
एनसीडब्ल्यूच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणल्या, याप्रकरणी निवडणूक आयोगशी संपर्क करणार आहेत. रेखा शर्मा एक्सवर म्हणाल्या, ‘कंगना तू एक योद्धा आणि शायनिंग स्टार आहेस. ज्यांना असुरक्षित वाटतं तेच लोकं अशा वाईट गोष्टी करतात. माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. तजिंदर बग्गा निवडणूक आयोगाला पत्र लिहित आहेत.’ सध्या सर्वत्र कंगनावर करण्यात आलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे.